महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड, वापरा, फोडा अन्…; जानकरांची सडकून टीका
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) महायुतीमधून (Mahayuti) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elecyion) लढविण्याची घोषणा केली. जागावाटपात आपल्याला विचारात घेतलं जात नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, महायुतीतून बाहेर पडल्यानंतर जानकरांनी आता महायुती आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.
“त्यांच्या त्रासामुळेच भाजप सोडतोय”; अजितदादांवर टीका करत माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड असून भाजप कधीच छोट्या पक्षांना मोठं होऊ देत नाही. वापरा, फोडा अन् फेकून द्या, हे त्यांचं धोरण असल्याची टीका जानकरांनी केली.
महादेव जानकर यांनी एका वृत्तपत्राला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसंच स्वबळावर निवडणूक लढवण्याचं कारणही सांगितले. ते म्हणाले, महायुतीमध्ये आम्हाला दुय्यम वागणूक मिळत होती. त्यांना आमचे अस्तित्वच मान्य नव्हते. जागावाटपाची चर्चा करत असतांना आम्हाला बैठकीला बोलावण्याचे सौजन्यही दाखवले गेले नाही. फक्त भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षातच चर्चा सुरू आहेत. त्यांना फक्त आमची मते हवी आहेत. आम्हाला वापरा, फोडा आणि फेकून द्या, अशीच त्यांची नीती आहे, अशी टीका जानकरांनी केली.
‘ते’ आंदोलन म्हणजे घरचं सत्यनारायण नव्हतं; दाखल गुन्हे मागे घ्या, राज ठाकरेंची मागणी
आम्हाला 12 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आम्हाला तीन-चार जागा देऊन आमची बोळवण केली जाईल अशी माहिती आम्हाला मिळाली होती.
जानकर पुढे म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील दौंड मतदारसंघातून आमच्या पक्षाचे नेते राहुल कुल निवडून आले. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. ते पुन्हा जिंकून आलेय. त्यामुळे लहान पक्षांचा टिकाव लागणे अवघड आहे. भाजप कधीच लहान पक्षांना मोठं होण्य़ात मदत करत नाही. उलट ते आमच्यातील जिंकणाऱ्या उमेदवारंना स्वत:कडे घेऊन पक्षाला आणखी कमजोर करतात, असंही जानकर म्हणाले. त्यामुळेच आता आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं जानकारांनी स्पष्ट केलं.
आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत राहू…
ते म्हणाले, संपूर्ण राज्यात जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहोत. सत्तेत येणे किंवा मंत्रिपद मिळवणे हे आमचे लक्ष्य नाही. तर आम्हाला जास्तीत जास्त मते मिळवायची आहेत, जेणेकरून पक्ष म्हणून आमचे अस्तित्व कायम राहिलं. आम्हाला किंगमेकरच्या भूमिकेच जायचे आहे. जर विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या आमदारांची भूमिका महत्वाची ठरेल, असंही जानकर म्हणाले.