दहा आमदार आले तरीही मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा..,; महादेव जानकरांनी रणशिंग फुंकलं
Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलंय. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीलाच घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं तर महायुतीला फटका बसल्याचं पाहायला मिळालं. अशातच पक्षांची विधासनभा निवडणुकीसाठी तयारी सुरु असताना महायुतीतील एका घटक पक्षाने स्वबळाचा नारा दिलायं. आपले 10 आमदार निवडून आले तरी पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं मोठं विधान करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. ते अकोल्यात बोलत होते.
मनोज जरांगेंनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार, 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार
अकोल्यात आज राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. मेळाव्यात संबोधित करताना जानकर म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढला पाहिजे, अशी अपेक्षा असते. अनेक पक्षांचे दलाल येतील त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी असा विचार करु नका रासप देखील एक दिवस राज्य करणार आहे. पक्षाची रेष वाढवायची आहे. त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघात तयारी करण्याचे काम सुरु झाल्याचं महादेव जानकरांनी स्पष्ट केलंय.
Bigg Boss Marathi: सगळे जाणार पाताळलोकात शोधायला सोन्याची नाणी, कोण कोणावर पडणार भारी?
पुढे बोलताना जानकर म्हणाले, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नाही. रासपने 288 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं असून त्यापैकी 109 ठिकाणी केंद्रनिहाय नियोजन केलं आहे, एखाद्या तालुक्यात 10 तर दुसऱ्या ठिकाणी 1 लाख मते आपल्या पक्षाला पडतील. एक आमदार असताना कॅबिनेट राज्यमंत्री असे दीड मंत्रिपद घेतले, आता 10 आमदार निवडून आणा, पक्षाचा मुख्यमंत्रीच करु, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली होती. परभणी लोकसभेत महायुतीचे महादेव जानकर यांचा दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीकडून मंथन बैठक आयोजित करण्यात आली. त्यात भाजपचे आमदार आणि परभणी लोकसभेचे निरीक्षक राम पाटील रातोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीत बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे पराभव झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.