Mhada Pune: जर तुम्ही देखील पुण्यात (Pune) स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्चमध्ये म्हाडा (Mhada) पुणे मंडळाने वेगवेगळ्या उत्पन्न गटातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. घरांसाठी अर्ज करण्याची मुदतही संपली आहे मात्र आता पुन्हा एकदा घरांसाठी अर्ज करण्याची संधी लोकांना मिळणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाने घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. याच बरोबर म्हाडा पुणे मंडळाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या देखील 100 ने वाढवली आहे. यामुळे आता अनेकांना पुण्यात स्वस्तात घर खरेदी करता येणार आहे. म्हाडा पुणे मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर आता अर्जदारांना 30 मे 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.
या वेबसाईटवर अर्ज करा
जर तुम्ही देखील या घरांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या वेबसाईटला भेट देऊन घरासाठी अर्ज करू शकतात. या वेबसाईटवर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून सबमिट करावे लागणार आहे. यानंतर जर लॉटरीमध्ये तुमचे नाव आले तर तुम्हाला घर मिळेल.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा : आधारकार्ड, पॅनकार्ड
सध्याचा वास्तव्याचा पुरावा : जर आधारकार्ड वरील पत्ता आणि सध्याच्या पत्ता वेगळा असेल तर अर्ज करताना सध्याचा पत्ता नमूद करावा लागणार आहे.
डोमासाईल सर्टिफिकेट
उत्पनाचा पुरावा : आयकर रिटर्न.
सनी लिओनीचे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील हटके लूक; चाहते झाले घायाळ