Download App

Jalna Maratha Andolan वर बोलण्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नकार; शरद पवार जालन्यात…

Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर जोरदार लाठीमार करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये आंदोलकांसह पोलीस देखील जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेचा राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे.

Maratha Andolan : लाठीचार्ज का केला? उत्तर द्या; मुनगंटीवारांना युवकांनी विचारला जाब

जालन्यामधील घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध केला जात आहे. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या घटनेवरुन राज्याचे मंत्री
आणि शासनाच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या घटनेविषयी विचारणा केली असता, त्यांनी मराठा आरक्षणावर बोलणं पद्धतशीरपणे टाळलं.

टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथे भेटण्यासाठी पोहोचले आहेत. त्याचवेळी शरद पवारांनी अंबड येथील रुग्णालयात पोहोचले आहेत.

मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्यानंतर जालन्यात होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला होणार आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर आजही शहरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Tags

follow us