Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही दोघांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंच्या आजारपणावर महाजनांनी टीका करत 137 कोटींची नोटीस आली म्हणून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी नाटक केले, अशी टीका महाजन यांनी केली होती. त्यांच्या याच टिकेवर खडसे यांनी जोरदार पलटवार केला होता. त्यानंतर आज महाजन यांनी प्रत्युत्त देत हा विषयाला कायमचा पूर्णविराम दिला.
गिरीश महाजन यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी खडसे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले. त्यावर महाजन यांनी थोडक्यात उत्तर देत हा विषय माझ्यासाठी संपल्याचे सांगितले. खडसेंचा विषय आता माझ्यासाठी बंद झाला आहे. त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे एकतर ते त्यांची लेव्हल सोडतात. त्यांना कमरेखालची भाषा जास्त आवडते. त्यामुळे आता मी त्यांच्या विषयावर बोलणच सोडलं आहे. आता पुढं काय काय होईल ते त्यांनीच पहावं.
Eknath Khadse : ..तर मी गिरीश महाजनांना भर चौकात जोड्याने मारेन; नाथाभाऊंचा पलटवार
भुजबळांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही
राज्यातील सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद झाला आहे. यातच आता छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला जबाबदार कोण ?
राजस्थानातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंंत्री शिंदे राजस्थानला गेले होते. तेथे शिंदेंचा हिंदुहृदयसम्राट असल्याचे फलक झळकले होते. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली. यावर महाजनांनी प्रत्युत्तर दिले. राऊत काहीतरी भडक वक्तव्य करत असतात. राऊत काय बोलतील सांगता येत नाही. आज शिवसेनेची जी अवस्था झाली त्याला कारणीभूत कोण आहे? असा सवाल उपस्थित करत यालाच खरी पनौती म्हणतात अशी खोचक टीका महाजन यांनी केली.
Girish Mahajan : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री स्वत:..; गिरीश महाजनांचं मोठं विधान
मनोज जरांगे पाटील यांच्या काही सभा पहाटेच्या वेळी झाल्या हे नियमात आहे का असे पत्रकारांनी विचारले. त्यावर महाजन म्हणाले, नियमानुसार सगळ्यांना परवानगी दिली जाते. मनोज जरागे यांच्या सभेला स्पेशल परवानगी दिली असं नाही. जर मनोज जरागे यांनी नियम मोडला असेल तर प्रशासन कार्यवाही करील. पहाटेपर्यंत सभा चालू असतील तर प्रशासन नक्की लक्ष घालेल. नियमाच्या बाहेर जाऊन अशा कुठल्याही सभा घेता येणार नाही.