Download App

चुकून गोळी सुटली अन् पोराच्या पायातून आरपार गेली; तानाजी सावंतांच्या बॉडीगार्डचा हलगर्जीपणा…

मंत्री तानाजी सावंत यांच्या बॉडीगार्डच्या हलगर्जीपणामुळे घरात बंदुकीतून निघालेली गोळी मुलाच्या पायातून आरपार गेल्याची घटना घडलीयं. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Tanaji Sawant Bodyguard News : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे सुरक्षा रक्षक (बॉडीगार्ड) याच्या हलगर्जीपणामुळे घरातच थरार घडलायं. कपाटात ठेवलेल्या बंदुकीला चुकून धक्का लागल्याने गोळी सुटली. बंदुकीतून निघालेली गोळी मुलाच्या पायातून आरपार गेल्याची घटना घडलीयं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वानखेडेंच्या राजकीय इनिंगला ब्रेक; शिवसेनेकडून निवडणूक लढवणार नाही; चर्चांना पूर्णविराम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नितीन शिर्के असं या सुरक्षा रक्षकाचं नाव असून नितीन शिर्के असं त्यांचं नाव आहे. ते निवृत्त लष्करी जवान आहेत. नितीन शिर्के सध्या तानाजी सावंत हे सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. घरातच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या दुर्घटनेत शिर्के यांचा 13 वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे.

महसूलमंत्री विखेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तासाभराच्या बैठकीत कोणती चर्चा ?

सुरक्षा रक्षक असल्याने शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी बंदुक कपाटातील एका पिशवीत ठेवली होती. या बंदुकीत गोळ्या भरलेल्या होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास मुलाने कपाट उघडले त्याचवेळी बंदुक जमिनीवर पडली. बंदुक जमीनीवर पडल्याने बंदुकीच्या चापावर दाब पडून गोळीबार झाला.

भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’, पुन्हा सुरु होणार क्रिकेट, चर्चेसाठी दोन्ही देशांकडून सहमती

दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शिर्के यांनी बंदुक ठेवताना निष्काळजीपणा केल्याने ही दुर्घटना घडलीयं. त्यामुळे पुण्यातील सहकारनगर पोलिसांत शिर्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

follow us