Download App

जिजामाता बॅंकेत बांदल-मांढरेंचा आमदार अशोक पवारांना दे धक्का

Pune Politics : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या जिजामाता सहकारी बँकची निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली. विद्यमान आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम समजली जात होती. मात्र आमदार अशोक पवार यांना राजमाता जिजाऊ पॅनलने जोरदार धक्का देत बँकेत परिवर्तन केले आहे. परिवर्तनाचे शिल्पकार मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंद्कर यांनी एकत्रित मोट बांधत पवारांना धोबीपछाड दिली आहे.

विशेष म्हणजे शिरुरमध्ये बांदल-मांढरे विरोधात आमदार अशोक पवार समर्थक पॅनल अशी थेटपणे लढत झाली. पवारांवर या त्रिकुटाने मात केल्याने विधानसभा 2019 नंतर झालेल्या अनेक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अशोक पवारांना अपयश पाहण्याची वेळ आली. जिजामाता सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 22 हजार मतदार होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 6500 एवढेच मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता होती. अर्थात शिरुरमधील सर्व राजकीय समिकरणे बिघडवणारी बॅंक निवडणूक म्हणून या निवडणूकीत पाहताना निकालही धक्कादायकच म्हणावे लागतील.

शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपात जाणार; रवी राणांचा खळबळजनक दावा, राणांनी वेळही सांगितली

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा बॅंक निवडणुकीत आमदार अशोक पवारांनी आपला वरचष्मा कायम ठेवला होता. पर्यायाने व्युहरचनेत अत्यंत वाकबगार समजल्या जाणाऱ्या पवारांकडून जिजामाता सहज जिंकली जाईल असा कयास लावला जात होता. मात्र त्यांचे कट्टर विरोधक मंगलदास बांदल तसेच बांदलांचे कट्टर विरोधक आबाराजे मांढरे व माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंद्कर यांनी एकत्रित मोट बांधत पवारांना धोबीपछाड दिली.

अर्थात एकाच वर्षावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादी पक्षासाठीही चिंतनीय आणि धोक्याचा इशारा देणारा ठरणारा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कोल्हापुरकरांना 100 कोटींचं गिफ्ट, रस्ते होणार चकाचक

राजमाता जिजाऊ पॅनलचे विजयी उमेदवार
सर्वसाधारण महिला गट : सुजाता जगताप, प्रणिता पठारे, मंगला भोजणे, रत्नमाला म्हस्के, पुजा वांजळे, सुनिता शितोळे, सुरेखा शितोळे, सुरेखा शेलार व रेखा बांदल.
खुला गट : आबाराजे मांढरे.
अनुसुचित जाती जमाती गट : अशोक काकडे.
इतर मागास वर्ग गट : जाकीरखान पठाण.
विमुक्त जाती-भटक्या जमाती गट : मनिषा कालेवार.

गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदा राजकीय वैर विसरुन आमदार अशोक पवारांसोबत उतरलेले भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष काका खळदकर यांच्या पत्नी संगीता खळदकर यांच्या विरोधात बांदल-मांढरे राजकीय वैर विसरले रेखा मंगलदास बांदल विजयी झाल्या.

गेली कित्येक वर्षे अशोक पवारांचे शिरुर शहरातील कट्टर समर्थक म्हणून जाकीरखान पठाण यांची ओळख होती. मात्र या निवडणूकीत तेही पवारांच्या विरोधात गेले अन त्यांनी अशोक पवारांचे कट्टर समर्थक असलेले माजी संचालक पंडीत दरेकर यांच्या भावजय सुनिता उत्तम दरेकर यांचा पराभव केला.

Tags

follow us