Download App

भामट्यांनी अजितदादांच्या आमदारालाही सोडलं नाही, 15 हजारांचा घातला गंडा

आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना इमोशनल ब्लॅकमेल करत 15 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली.

  • Written By: Last Updated:

MLA Dattatraya Bharane cheated by 15 thousand : आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना इमोशनल ब्लॅकमेल करत 15 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली. खुद्द भरणेंनीच याबाबत सांगितलं आहे. सध्या चोऱ्या-माऱ्याचं प्रमाण वाढलं आहेत. तसंच इमोशन ब्लॅकमेल करण्याचं प्रमाणही वाढलं असून याकडेही पोलिसांनी लक्ष द्यावं, असं सांगत आपलीही फसणू झाल्याचं भरणेंनी सांगितलं.

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘स्त्री 2’ मध्ये खास कॅमिओ करणार ? 

भरणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मला एक फोन आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की, आम्ही इंदापूरचे असून आमच्या कारला अपघात झाला आहे. कारमधील दोन व्यक्ती जागाीच ठार झाल्यात. आम्ही देखील जखमी झालोत. आम्ही दवाखान्यात भरती असून आमच्याकडे पैस नाहीत. आम्हाला उपचारासाठी पैसे पाठवा, अशी विनवणी त्यांनी केली.

CCI Recruitment : कॉटन कॉर्पोरेशनमध्ये 214 रिक्त पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज? 

त्यानंतर मी दवाखान्यात पैसे घेऊन माणूस पाठवतो, असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी माणूस पाठवू नका, फोन-पेवर तातडीने पैसे पाठवा असं सांगितलं. त्यानंतर मी देखील मदतीचा हात पुढे करत लगेच पैसे पाठवले. मात्र त्यानंतर हा अपघात नसून फसवणूक करणारी टोळी असल्याचं समोर आलं, असं भरणेंनी सांगितलं.

भरणे म्हणाले, माझी फसवणूक झाल्याचे मी बाहेर कोणाला सांगितले नाही. मात्र अशाच प्रकारे आणखी एका आमदाराची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे यापासून आपण योग्च ती खबरदारी घेतली पाहिजे, ही फसवणूक करणारी टोळी पालघरची आहे, असे भरणे म्हणाले. इंदापूरमधील आढावा बैठकी दरम्यान भरणे बोलत होते.

follow us