Pune Politics: अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या बैठकीतून आमदार धंगेकर तडकाफडकी पडले बाहेर

विष्णू सानप  पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 27 मार्च) पुणे शहरातील विविध विषया संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीत पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) आणि बैठकीला निमंत्रित आमदारांपेक्षा भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच […]

Ravindra Dhangekar Chandrakant Patil

Ravindra Dhangekar Chandrakant Patil

विष्णू सानप 

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 27 मार्च) पुणे शहरातील विविध विषया संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीत पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) आणि बैठकीला निमंत्रित आमदारांपेक्षा भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच जास्त बोलत असल्याचे (Pune Politics) कारण देत आमदार धंगेकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला आहे.

Uddav Thackeray on Rahul Gandhi : भरसभेत ठाकरेंनी टोचले राहुल गांधींचे कान | LetsUpp Marathi

धंगेकर म्हणाले, आज चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील विविध विषयासंदर्भात महापालिका (Municipality) अधिकारी आणि सहा निमंत्रित आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांपेक्षा भाजपची कार्यकर्ते जास्त बोलत होते. गणेश बिडकर हे नगरसेवक नाहीत किंवा कुठले पदाधिकारी नसून देखील पालकमंत्र्यांपेक्षा जास्त या मीटिंगमध्ये बोलत होते. या बैठकीचा ताबा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. यामुळे आपण या बैठकीतून काढता पाय घेतल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटलांना अशीच बैठक घ्यायची होती.तर त्यांनी थेट जनतेमध्ये जाऊन बोलायला पाहिजे होते. या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे कार्यकर्तेच जास्त बोलत होते. या बैठकीमध्ये शहरातील रस्ते, जायका प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प आणि पाण्याची योजने संदर्भात चर्चा होणार होती. या चर्चेमध्ये मला देखील माझं मत व्यक्त करायचं होतं. मात्र, असा बैठकीतील प्रकार बघून आपण निघून आलो असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

मांजरी ग्रामस्थांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल

दरम्यान, बैठकीत बसल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माझ्याकडे साधं बघितलंही नाही. तसेच, मी निघून आलो तेव्हा त्यांना कळले देखील नसेल की मी या बैठकीला आलो होतो, असा टोला देखील त्यांनी लगावला. दरम्यान, नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. यामुळे धंगेकरांच्या नावाची चर्चा राज्यभर झाली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी धंगेकर कोण आहे?, असं म्हणून प्रचारसभेत त्यांना हिनवले होते. मात्र, धंगेकरांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेमक पाटलांच्या तोंडच्या याच वाक्याचा उल्लेख करून त्यांना डिवचत आहेत. दरम्यान आज पाटील आणि दंगेकर बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर आले होते. मात्र, धंगेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप पाहून बैठकीतून काढता पाय घेतला आहे. आता यावर पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version