Rohit Pawar On Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. अजित पवार म्हणजे लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असे पडळकरांचे विधान आहे. अजित पवार हे भाजपबरोबर सत्तेत असूनही पडळकरांनी अशी टीका केल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. पडळकरांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. अजित पवार गटाकडून तर थेट आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. त्यातून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यात येत आहे. तर आता रोहित पवार हे काकांच्या मदतीला धावून आले आहेत.
राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात.
उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका…— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 18, 2023
रोहित पवार यांनी अजितदादांच्या समर्थनात एक ट्वीट केले आहे. राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय शरद पवार, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज द्यायला हवी. अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावे, अशा शब्दात रोहित पवारांनी फडणवीसांनाही डिवचले आहे.
तामिळनाडूत भाजपाला मोठा धक्का, AIADMK ने केली युती तोडण्याची घोषणा
त्याचबरोबर आक्षेपार्ह, वादग्रस्त विधान करणाऱ्यांनाही रोहित पवारांनी एक सल्ला दिला आहे. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका-टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी; म्हणाले, ‘सनातन कधीच संपणार नाही उलट..,’
दरम्यान, पडळकरांविरोधात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. पुण्यात पडळकरांचा तीव्र निषेध करत आंदोलन करण्यात आले आहे. तर अकोला येथे आमदार अमोल मिटकरी यांनीही आंदोलन केले. परंतु त्यात पडळकरांची जीभ घसरली. त्यांनी पडळकरांना रानडुक्कर, गोप्या, फडणवीसांचा पाळीव कुत्रा असे शब्द वापरले आहे.