देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी; म्हणाले, ‘सनातन कधीच संपणार नाही उलट..,’
सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट संपवण्याची भाषा करणारेच संपणार असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस कालपासून मध्यप्रदेश दौऱ्यावर असून जनआशिर्वाद यात्रेत ते सहभागी झाले होते. याचदरम्यान, जाहीर सभेत त्यांनी सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे.
IND vs AUS: टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती; अश्विनचे पुनरागमन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन धर्म ही आपली प्राचीन संस्कृती असून देशात कुणीही इतरांच्या धर्माबद्दल बोलू नये. पण, अन्य कुठल्या धर्माबद्दल कुणी बोलले तर मोठा गजब होतो. सनातन धर्म संपविण्याची भाषा करणे आणि त्यातून स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, यापेक्षा दुसरा कोणता मुर्खपणा असूच शकत नाही. सनातन धर्म तर कधीच संपणार नाही. पण, त्याविरोधात जे विचार व्यक्त करतील, ते स्वत:च संपल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारात त्यांनी यावेळी दिला आहे.
राजस्थानच्या राजकारणात CM शिंदेंची एन्ट्री; भाजपसाठी आव्हान की काँग्रेसची वाट बिकट होणार?
तसेच सनातन धर्मावर जेव्हा-जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा विरोध केला. अहिल्यादेवी होळकर यांनी तर अनेक मंदिरांचे पुनर्निमाण केेले, हा इतिहास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन याचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी विधान केलं होतं. सनातन धर्म हा मच्छर, डेंग्यूसारखा आहे. त्यामुळे सनातन धर्म संपवला पाहिजे, असं विधान उदयनिधी स्ट्रलिन यांनी केलं होतं. त्यावरुन देशभरातील भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आली.
‘अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपचाच’; खोतकरांच्या वक्तव्याने खळबळ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उज्जैन येथील महाकाल बाबाचे दर्शन घेत पूजा केली. त्यानंतर ते मध्यप्रदेशातील जनआशिर्वाद यात्रांमध्ये सामिल झाले, त्यानंतर ते इंदूर, धार, कालीबिल्लोद, बेटमा, महू येथे जाहीर सभांना, बैठकांना संबोधित केले. या सभांना मंत्री मोहन यादव, राजवर्धन सिंग, विक्रम वर्मा आदी नेते उपस्थित होते.
…तर मीही उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या प्रेसला जाणार अन् प्रश्न विचारणार
राहुल गाधींवर टीकास्त्र :
ज्या प्रदेशात काँग्रेसने कोणती गॅरंटी दिली, तेथे त्यापैकी एकही वचन ते पूर्ण करु शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत नागरिकांच्या जीवनात जो बदल केला, तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसतो आहे. आज इंडीया आघाडीत कुणीच कुणाला नेता मानायला तयार नाही. आघाडी एकमेकांना सामावून घेणारी असते. येथे मात्र, तसे चित्र नाही. एका पक्षाचे दुुसर्या राज्यात अस्तित्त्व नाही, असे पक्ष एकत्र येऊन काहीच फायदा होत नसतो. राहुल गांधी सकाळी काय म्हणतात, ते त्यांना रात्री ठाऊक नसते आणि रात्री जे बोलले ते दुसर्या दिवशी सकाळी त्यांना आठवत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, इंडिया आघाडीचा एकच अजेंडा आहे, मोदी हटाव. कारण त्यांना ठाऊक आहे, आणखी 5 वर्षांसाठी मोदीजी आले, तर त्यांची दुकाने बंद होणार आहेत, अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.