Download App

रोहित पवारांचे मस्केंना चोख उत्तर; म्हणाले लोक धडा शिकवतील

  • Written By: Last Updated:

पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी अजित पवार यांच्यावर आज एक मोठा आरोप केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा, यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा आरोप मस्केंचा आहे. त्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी मस्केंना चोख उत्तर दिले आहे. थेट राज्य सरकारकडे रोहित पवार यांनी बोट करत हे लोक खालच्या पातळीवर बोलत आहेत. लोकच त्यांना उत्तर देतील, असे पवार म्हणालेत.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक दहशत संगमनेरात, थोरातांचा विखेंना टोला

मस्केंच्या आरोपानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही मस्केंना जोरदार उत्तर दिले आहे. पिंपरी-चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आलेले आमदार रोहित पवार यांनी मस्केंना चांगलेच फटकारले आहे. हे लोक खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे. परंतु त्यांना लोक स्वीकारणार नाहीत. महाराष्ट्राला अशी परंपरा नाही. पण गेल्या काही दिवसांपासून हा ट्रेंड झाला आहे. हे सरकार तसे वागत असल्याचे पवार म्हणाले.

शिवतारेंनी दोन गावे फोडली : फुरसुंगी, उरुळी देवाची पुणे महापालिकेतून बाहेर!

काही घटनांवरून कोर्टाने सरकारला फटकारले आहे. हे सर्व सामान्य लोकांना कळते. येत्या काळात लोकशाहीच्या मार्गातून लोकच त्यांना धडा देणार आहेत. त्यांना लोक सत्तेतून बाहेर करतील, असे मतही रोहित पवारांनी व्यक्त केले आहे.

गेल्या नऊ महिन्यात राज्यात काय चालू आहे आपण बघतो आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार आहे. हे माझ्यासह जनतेचे मत असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us