नगर जिल्ह्यात सर्वाधिक दहशत संगमनेरात, थोरातांचा विखेंना टोला

नगर जिल्ह्यात सर्वाधिक दहशत संगमनेरात, थोरातांचा विखेंना टोला

अहमदनगर : जिल्ह्यातील आजी – माजी मंत्री म्हणजेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे सुरूच असतात. नुकतेच थोरातांनी नाव न घेता विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे. अहमदनगरमध्ये सर्वात जास्त दहशत संगमनेरमध्ये सुरू आहे, असे म्हणतच थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेसने देशभर आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच पत्रकार परिषद घेत माजी महसूलमंत्री तसेच काँगेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी बोलताना थोरात यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर देखील टीका केली आहे.

अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत जे घडलं ते दुर्दैवी आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी ही बँक कामधेनू आहे. संस्था जगली, तर शेतकरी जगेल. अहमदनगरमध्ये सर्वात जास्त दहशत संगमनेरमध्ये सुरू आहे, असे नाव न घेता थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले, सरकार विरोधात बोलणाऱ्यांची विविध माध्यमातून गळचेपी केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानी घोटाळ्यासंबंधी सरकारला फक्त प्रश्न विचारला, तर सरकारकडून चकार शब्दानेही उत्तर आले नाही.

लोकशाहीचा आवाज दाबण्याचे षडयंत्र सरकारकडून सुरू आहे. देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, बेराजगारी, महागाई, राहुल गांधींवरील कारवाई संदर्भात जाब विचारण्यासाठी गावपातळीपासून देशपातळीपर्यंत लवकरच आंदोलन पुकारण्यात येणार आहे, असे थोरात म्हणाले आहे.

सध्या लोकशाही धोक्यात आहे. राहुल गांधी यांनी अदानीच्या खात्यावर २० हजार कोटी आले कुठून असा प्रश्न विचारला असता सरकारकडून काहीच बाेलले जात नाही. गांधी यांना याबाबत संसदेत बोलण्याची परवानगी दिली जात नाही. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातो.

साईं दरबारीच भक्त आणि सुरक्षा रक्षक भिडले

छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार होत आहे. हे सर्व हाताळण्याची जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे.  महाविकास आघाडीची २ एप्रिलला सभा होणार आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक दहशत संगमनेरात, थोरातांचा विखेंना टोला

सरकार मदत करण्यासंबंधी फक्त बोलताना दिसत आहे. मात्र, मदत करताना काही दिसत नाही. कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासाठी मोठा गाजावाजा करून घोषणा तर केली, मात्र, अनुदानासाठी बहुतांश जाचक अटी घातल्या. त्यामुळे अनुदान मिळते की नाही, शंका आहे. असे थोरात यावेळी बोलताना म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube