Download App

तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या!

Raj Thackeray : ‘मी बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंतांना पाहतो त्यात काही चुका दिसतात. राग मानू नका पण या चुका मी येथे मांडणार आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान देत नाहीत. लोकांसमोर ‘पक्या’, ‘अभ्या’, ‘अंड्या’, ‘शेळ्या’, ‘मेंढ्या’ अशा नावाने हाका मारतात. मराठी चित्रपटात (Marathi Cinema) स्टार नाही फक्त कलावंत आहेत. इथे स्टार्स होते. पण आपणच एकमेकांना काय शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो. तुम्हीच जर एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय देणार? दक्षिणेत कलाकार एकमेकांना आदर देतात. त्यांच्याकडे एकदा पाहा. तुम्ही एकमेकांना लोकांसमोर मान द्या. तुम्ही तुमचं मोठेपण जपा. छोट्या शब्दांत एकमेकांना लोकांसमोर हाका मारू नका. चारचौघात एकमेकांचा अपमान करू नका. तुमची जी काही आपुलकी आहे ती चार भिंतीत तुमच्या घरात ठेवा’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी कलाकारांचे कान टोचले.

Raj Thackeray : ‘इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढणार’ राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज यांनी रोखठोक व्यक्त करत मराठी कलाकारांना चांगलेच फटकारले. राज ठाकरेंनी एका हिंदी चित्रपट दिग्दर्शकाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी हिंदी चित्रपटातील एका मित्राला भेटलो. त्यावेळी मी त्याला एका मराठी कलाकाराबद्दल विचारलं. सुरुवातीला त्याच्या लक्षातच आलं नाही की मी कुणाबद्दल बोलतोय. ज्यावेळी मी त्याला छोट्या नावाने विचारलं त्यावेळी झटक्यात त्याच्या लक्षात आलं. ही मराठी कलाकारांची हिंदीत अवस्था आहे, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही हिंदी चित्रपटात काम केलं. पण, त्यांना कुणी अशा नावांनी हाका मारल्याचं मी तरी अजून ऐकलेलं नाही. हिंदीतील लोक अजूनही त्यांना अशोक सर अशाच नावाने हाक मारतात.  दक्षिणेत गेलात तरी रजनीकांत असो किंवा अन्य कुणी कलाकार. ते एकमेकांना आदरानेच बोलतात या गोष्टींचा मराठी कलाकारांनाही विचार करावा. लहान नावाने हाका मारू नका. मला तर वाटतं या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने कलाकारांनी शपथ घ्यावी की एकमेकांना मान देऊ आणि मान घेत राहू, असे राज ठाकरे म्हणाले.

Kiran Mane : शून्यातून विश्व निर्माण करणारी कष्टाळू माणसं पाहिल्यावर.. किरण मानेची खास पोस्ट

राजकारणात भान ठेऊन बोलावं लागतं. फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे. मलावॉल्ट डिस्नेत अॅनिमेटेड व्हायचं होतं. स्वतःचा अॅनिमेशन स्टुडिओही काढला होता. मला चित्रपट समजतो पण मला नाटकाचं जास्त कुतुहल आहे. मला अजूनही नाटक समजलं नाही. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणायच्या ही सोपी गोष्ट नाही. सर्वात कठीण माध्यम नाट्य क्षेत्र आहे.

सगळेच मोबाइल अन् रिल्समध्ये अडकले 

मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरत चालला आहे. मोबाइल आणि त्यातील रिल्समध्ये सगळेच अडकले आहेत. कधीकाळी आपण हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो. या देशाचा पंतप्रधान महाराष्ट्राने बसवला. पण आज आपण फक्त जातीपातीत भांडत बसलो आहोत, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

follow us