Kiran Mane : शून्यातून विश्व निर्माण करणारी कष्टाळू माणसं पाहिल्यावर…; किरण मानेची खास पोस्ट

Kiran Mane : शून्यातून विश्व निर्माण करणारी कष्टाळू माणसं पाहिल्यावर…; किरण मानेची खास पोस्ट

Kiran Mane : अभिनेता किरण माने काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर (Social Media)आपल्या खास पोस्टमुळे चर्चेत असतात. किरण माने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असतो. त्यातच आता अभिनेता किरण मानेनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून साताऱ्यामधील (satara)शेंगदाणे विक्री करणाऱ्या सतीशरावांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

किरण मानेनं (Kiran Mane)आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, राजवाड्यावरनं तुला सतीश शेंगदानावाल्याकडचे शेंगदाने आनून दिन.” आसं म्हणलं की, लहानपनी मी कितीबी रडून धिंगाना घातला असला तरी गप बसायचो. दादांना माझं हे गुपित नीट म्हायती होतं. कारण अख्ख्या सातार्‍यागत त्यांनाबी या शेंगदान्यांची भुरळ पडली होती! जगात भारी चव. त्यावेळी मी चारपाच वर्षांचा असेन, आज त्रेपन्न वर्षांचा हाय. आजबी आमची तिसरी पिढी, माझा पोरगा आरूष, राजवाड्यावर गेल्यावर सतीशरावांचे शेंगदाने खाल्ल्याशिवाय परत येत नाय. हे माझंच नाय, समस्त सातारकरांच्या पिढ्या-पिढ्यांचं ‘व्यसन’ हाय!

Happy Birthday Virat Kohli : विराटचे मॅचविनिंग रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार

मी ‘बिगबॉस’मध्ये एकदोनवेळा म्हणालो होतो की “यार, राजवाड्यावरचे शेंगदाने मी मिस करतोय.”ते बघून सतीशरावांचं मन इतकं भरून आलं की त्यांनी जाहीर केलं “आमचा सातारचा बच्चन किरण माने आन् त्याच्या परीवारासाठी सतीश शेंगदानेवाल्याकडचे शेंगदाने फ्री मिळनार ! “काल लै दिवसांच्या गॅपनंतर सतीशरावांना भेटलो. “ऐSSSS किरSन आरं य्ये भावा.” करत मिठीच मारली त्यांनी. मला म्हणाले, “एक जानेवारीला माझ्या व्यवसायाला पन्नास वर्ष पूर्ण होनारंयत.

या व्यवसायानं मला सगळं ऐश्वर्य दिलं. पैसा, बंगला, गाडी भरभराट झाली. सहा शाखा जोरात सुरू हायेत आजबी. त्याची परतफेड म्हनून येत्या एक जानेवारीला सकाळी दहा ते रात्री दहा सगळ्या सातारकरांना माझ्याकडचे स्पेशल एक नंबर शेंगदाने, महाबळेश्वरी फुटाने, डाळ, गुळ शेंगदाणा चिक्की, कडक वाटाणा, सोयाबीन, सुर्यफूलाची बी… काय पायजे ते, आन् कितीबी मी फ्री देनार ! त्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं उद्घाटन आमचा किरण माने करनार. तू पायजेच मला. शुटिंग बिटींगची कारनं मला सांगायची नाहीत.” मला भरून आलं.

मला शुन्यातनं विश्व निर्माण करनारी कष्टाळू माणसं पाहिली की त्या माणसात माझा आज्जा नाना दिसतो! माझा आज्जा शेतमजूर होता, नंतर मुंबईत मिलमध्ये हमालीबी केली. आमचे सतीश रावखंडे शेंगदानेवालेबी वखारीत हमाल होते. हातावर पोट. एक दिवस ती वखार जळली. हातचं काम गेलं. संसार कसा चालवायचा? हमाली करताना दहा पैसे, चार आने, आठ आने असे पैसे साठवून बावीस रूपये जमा झालेवते.

त्यात शेंगदान्याचा व्यवसाय सुरू करूया असं डोक्यात आलं. मिठाचं प्रमान आणि भाजन्याची पद्धत हीच युनिक आन् सिक्रेट रेसीपी. बघता-बघता व्यवसाय नांवारूपाला आला. आज एवढं वय आनि पैशापान्यानं भक्कम होऊनबी सतीशराव आजबी राजवाड्यावरच्या स्टॉलवर उभे राहून सेवा देत असत्यात. सतीशराव तुमच्या कष्टाळू आणि दिलदार वृत्तीला कडकडीत सलाम ! लब्यू

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube