Raj Thackeray : ‘इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढणार’; राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

Raj Thackeray : ‘इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढणार’; राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

Raj Thackeray : राज्यातील टोलनाक्यांच्या मु्द्द्यावर आक्रमक झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई, ठाणे आणि कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ‘मी कधीच असं राजकारण पाहिलं नव्हतं’, असं राज ठाकरे म्हणाले. ‘ज्या नागरिकांना राग येत नाही, त्या देशाचे काय करायचे? मुंबईत त्याच कंत्राटदाराचे ९८० कोटींचे काम सुरू आहे ज्याचे ब्रिज पडतात. त्यालाच हजार-हजार कोटींचे काम दिले जात आहे. कायदा व भीती नावाची गोष्टच उरली नाही. कुणाला शासन व्हायची भीती नाही. लोकांनाही याचा राग येत नाही. माझ्या आत ज्या गोष्टी धुमसत आहेत त्या योग्य वेळी मी बाहेर काढेन. इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन. मग यांना कसे चटके बसतील पहाच’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

पुण्यातून पळालेला ललित पाटील मुंबई पोलिसांना कसा सापडला? वाचा इनसाईड स्टोरी

राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘मी भाषण करायला आलो नाही. काही माहिती द्यायची आहे, त्यासाठी आलोय. पुढच्या वर्षी येणाऱ्या मुंबई व कोकण पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा विषय आहे. भारत काय, इंडिया काय, हिंदुस्थान काय? एकमेव देश असेल, जिथे अशी लोकशाही चालते. जिथे पदवीधर येऊन मतदान करतात. उमेदवारी फॉर्मवर लिहिले होते, सही किंवा अंगठा म्हणजे- उमेदवार पदवीधर नसला तरी मतदार हा पदवीधर असला पाहिजे.’

कोट्यावधी रुपयांचा नुसता चुराडा 

‘टोलचाही मुद्द महत्वाचा आहे. आता ९० कॅमेरे टोल नाक्यावर लागले आहेत. समजतच नाही किती गाड्या येतात, किती जातात? आरटीओ मध्ये हजार हजार गाड्या रोज रजिस्टर होतात. टोलवर तितक्याच गाड्या, आता रेकॉर्ड करू या. यलो लाईनच्या बाहेर गाडी दिसली की डायरेक्ट लंकेला पळवायची. काल कोकणात ब्रिज पडला. मी बोललो होतो सगळ्यांना ब्रिजचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे. तुम्ही मरा, फक्त मतदानादिवशी जीवंत राहिला पाहिजे. मंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. मंत्री रवींद्र चव्हाण एक लेन सुरू करणार होते. करोडो रुपये फुकट जात आहेत. मतदान सुरु, निवडणूक सुरु आहे. त्याच त्याच लोकांना मतदान लोक करत आहेत. हे राज्य म्हणायचं की काय म्हणायचं?’, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

ललित पाटीलला पुण्यात ‘एन्काऊंटरची’ भीती; न्यायालयात पोलिसांवर मोठा आरोप

जो पक्ष सत्तेत तोच विरोधात

‘महाराष्ट्रात विचित्र व घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे एकच पक्ष आहे. अर्धा पक्ष सत्तेत आहे, अर्धा पक्ष बाहेर आहे. सत्तेत शिवसेना, विरोधी पक्ष शिवसेना, सत्तेत राष्ट्रवादी, बाहेर राष्ट्रवादी असे जगात कुठे असत का?’, असा टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube