Raj Thackeray : शि. द. फडणीस (S. D. Fadnis) हे 100 व्या वर्षातही अतिशय ताठपणे चालत आहेत, तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं तरी पुरे आहे. कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुती (Mahayuti) सरकारला लगावला आहे.
शरद पवारांसोबत पार्टनरशीप करुन देतो : ऑफर ऐकताच कॉन्स्टेबलने सगळं विकलं अन् 93 लाखांची फसवणूक
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस हे आज (ता. 29) 100 व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी संबोधित करतांना राज ठाकरे म्हणाले की, शि द सरांची घरी गेल्यावर दृष्ट काढा. एक-दोन जणांनी नाही तर सर्वांनी दृष्ट काढा. ते आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. फडणीस हे 100 व्या वर्षातही अतिशय ताठपणे चालत आहेत, तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं तरी पुरे आहे. कारण एवढं वय नसतानाही सरकारवर वाकलेलं आहे. जास्त बाहेरचे लोकं घेऊ का, या झाडाची फळं पाहिजेत, त्या झाडाची फळं पाहिजेत असं करू नका, असा सल्ला राज ठाकरेंनी महायुती सरकारला दिला.
Southport Stabbing : यूकेमध्ये खळबळ, अनेकांवर चाकूने हल्ला, एकाला अटक
पुढं बोलतांना राज ठाकरे म्हणाले, शि द फडणीस सरांना फक्त ‘व’ ने वाचवलं आहे. ते फडणीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
कल्पना आणि उत्तम रेखाटन येतं, तेव्हा त्याचं व्यंगचित्र होत. कल्पना चांगली आहे, पण चित्र खराब काढलं तर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. उत्तम चित्र काढलं आणि कल्पना चांगली नसेल तरीही प्रभाव पडत नाही. मात्र, शि द फडणीस सरांनी उत्तम कल्पना आणि उत्तम चित्र काढून कलेच्या क्षेत्रात दबदबा कायम ठेवल्याचे कौतुगोद्गार राज ठाकरेंनी काढले
आर्ट्स स्कुल सुधारण्याची गरज
राज ठाकरे म्हणाल, मला आनंद आहे की, आमच्या वयामध्ये खूप अंतर आहे. पण, शि. द. फडणीस आणि मी एकाच आर्ट्स स्कुलचे विद्यार्थी आहोत. खरंतर आज अकादमीची गरज नाही, आहेत त्या आर्ट्स स्कुल सुधारण्याची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
…अन् उंदीरे दूध पिताहेत
मला एक व्यंगचित्र आठवलं. ते असं की, एक माजंर आहे, तिच्या बाजूला काही पिल्ल आहेत. आणि बाजूला उंदीर दूध पितेय. मी आज तसं व्यंगचित्र काढलं असतं तर मी दाखवलं असतं की, मांजर तिथंच आहे. पिल्लं अगावरच्या पट्ट्यांवरून तू कोणत्या जातीचा? कोणत्या धर्माचा यावरून भांडत आहे. बाकी उंदरे दूध पिताहेत. ती मांजर म्हणजे महाराष्ट्र आहे, अशा शब्दात राज्यातील सामाजिक परिस्थितीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं.