Download App

MNS Signature Campaign: पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा; मनसेची नवी मोहीम

MNS Signature Campaign : पुण्यातील पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृतीबाबत मनसेतर्फे सह्यांची मोहीम राबवली जात आहे.

MNS Signature Campaign : रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) येथे झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृतीबाबत अनेक प्रश्न (Pub Culture) उपस्थित केले जात आहेत. (Pune Hit And Run Case) पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे, अशी मोहीम आता मनसेनी सुरु केली आहे.

पब संस्कृती संपली पाहिजे : शिक्षणाचं माहेर घर, सुसंस्कृत शहर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेलं आपलं पुणे शहराची आज पब्ज-बार डिस्कोचे शहर, ड्रग्ज च्या विळख्यात अडकलेले शहर अशी ओळख निर्माण होत आहे. काही मूठभर धंदेवाईक आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज आपलं नामांकित शहर नाहक बदनाम झाले आहे. आज शहरातील तरुणाई ह्या पब संस्कृतीमुळे ड्रग्स आणि दारूच्या गर्तेत सापडली असून यामुळेच अनेक दुर्दैवी घटना शहरात घडल्या आहेत आणि यापुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळेच शहराला कलंक असलेली ही विकृत पब संस्कृती पुण्यातून हद्दपार झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ‘लोकसहभाग व जनजागृती मोहीम’ हाती घेण्यात येत आहे. उद्यापासून मनसेनी शहरातील विविध ठिकाणी पब बंद करावेत. याकरिता नागरिकांकडून हजारो अर्ज भरून घेऊन स्वाक्षरी मोहीम राबविणार आहेत तसेच चौकाचौकात बोर्ड बॅनर घेऊन उभे राहून व थेट लोकांमध्ये जाऊन या पब संस्कृतीला हद्दपार करण्यासाठी जनसमर्थन घेणार आहेत. अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार होत असलेल्या या उपक्रमाची सुरुवात शनिवार (दि 25) सकाळी 10 वाजता ठिकाण शनिपार चौक, चितळे स्वीट जवळ आणि सायंकाळी 4 वाजता गुडलक चौक, कलाकार कट्टा जवळ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी केली आहे. तर पुण्यातील अनेक पबमध्ये पोलिसांचीच भागिदारी आहे. अनेक पोलीस खात्यातील पोलीस कर्मचारी हे नाचताना पाहायला मिळत असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

follow us