पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश!

PMRDA च्या सुनियोजित आणि शाश्वत विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘प्रारूप संरचना योजने’च्या (स्ट्रक्चरल प्लॅन) कामाला आता गती मिळाली आहे.

PMRDA

PMRDA

Momentum gathers for PMRDA’s ‘Structural Plan’ all government departments directed to submit plans within eight days : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्राच्या सुनियोजित आणि शाश्वत विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘प्रारूप संरचना योजने’च्या (स्ट्रक्चरल प्लॅन) कामाला आता गती मिळाली आहे. ही योजना अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती आणि आगामी २० वर्षांचे नियोजन सर्व संबंधित शासकीय विभागांनी येत्या आठ दिवसांत सादर करावे. यात मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या माहितीचा समावेश असावा, असे स्पष्ट निर्देश ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) दिले.

हा एस्टॉपेलचा मुद्दा नाही; शिंदे गटाचा ठाकरे गटावर तार्कीक वार, 2018च्या पक्षघटनेवर शिंदेंच्या वकिलाचा जोरदार प्रहार

आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’च्या मुख्यालयात डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची समन्वय बैठक पार पडली. या वेळी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, उपमहानगर नियोजनकार सौरभ पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस, एमआयडीसी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, महापारेषण, पुणे मेट्रो, पीएमपीएमएल आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल, नितीन गडकरींना मोठा धक्का; खातं जाणार?

या बैठकीत ‘स्ट्रक्चरल प्लॅन’च्या रूपरेषेवर सादरीकरण करण्यात आले. विविध विभागांमधील समन्वय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाल्यानंतर महानगर आयुक्तांनी माहिती संकलनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. “विविध विभागांकडून प्राप्त होणारी माहिती हा नियोजनाचा गाभा आहे. त्यामुळे ही माहिती संबंधित विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष तपासून आणि प्रमाणित करूनच सादर करावी, जेणेकरून भविष्यातील नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही,” असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

माहिती संकलनात कोणतीही गळती किंवा अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाने तत्काळ एका ‘नोडल अधिकाऱ्याची’ नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अनधिकृत व्यक्तींकडून माहिती गोळा केली जाऊ नये, यासाठी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे आणि नियुक्त अधिकाऱ्यांमार्फतच पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण (डेटा शेअरिंग) करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवली, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

आगामी २० वर्षांचा दूरगामी विचार करून सर्व शासकीय संस्थांनी आपापल्या प्रकल्पांचे आणि जागेच्या आवश्यकतेचे प्रस्ताव वेळेत देणे अपेक्षित आहे. सर्व संस्थांच्या एकत्रित समन्वयातून ही योजना अधिक गतिमान करण्यावर ‘पीएमआरडीए’चा भर असून, ही माहिती लवकरात लवकर ‘पीएमआरडीए’च्या नियोजन विभागाकडे सादर करावी, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Exit mobile version