Monsoon Alert 2026: मान्सून महाराष्ट्राला उशीरा व्यापणार ? शेतकऱ्यांना सरकारचा अलर्ट

Monsoon Alert 2026-कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल.

Monsoon Update

Monsoon Update

Monsoon Alert 2026: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात (Monsoon Alert) अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु मान्सून (Monsoon) महाराष्ट्राला उशीरा व्यापणार आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये किमान 10 जूनपर्यंत आगमनाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Monsoon Alert 2026: Will monsoon cover Maharashtra late? Government’s alert to farmers)


मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; ‘आता थांबवायचं कसं?’ मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल. मात्र विदर्भातील काही भागांमध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान 40 अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.

गोलंदाजाला 5 ओव्हर अन् Impact Player रद्द करण्याची मागणी; सचिन तेंडुलकरने सुचवले IPL साठी 3 नवीन नियम

1 जूनपासून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी व तसेच पेरणीची घाई करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.

विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version