Medha Kulkarni On Shekhar Charegaonkar : खासदार मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यात वाद वाढला असून शेखर चरेगावकर यांनी भाजपच्या (BJP) पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी केला आहे. शेखर चरेगावकर (Shekhar Charegaonkar) हे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी यशवंत सहकारी बँकेत तब्बल 150 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
तसेच या प्रकरणात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आरबीआयच्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी आणि या घोट्याळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांकडे (Amit Shah) केली असल्याची देखील माहिती या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणात सहकार मंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली असून देखील आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही अशीही माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तर शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल सुरेश चारेगावकर यांनी मला धमकीचे फोन केले असा आरोप देखील त्यांनी केला आहे. कोणाच्या नादी लागताय? या आधी आम्ही त्यांचं तिकीट कापलं यापुढे देखील त्यांचं तोंड कसं बंद करायचं हे आम्हाला माहित आहे. अशी धमकी शार्दूल चारेगावकर यांनी दिली असल्याचा दावा या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
हृतिक रोशन एनटीआर साठी ‘वॉर 2’ सोबत आणणार धमाकेदार बर्थडे सरप्राइझ!
तर या प्रकरणात अधिकाऱ्यांवर सरकारमधील लोकांकडून दबाव असल्याचा दावा देखील खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. माहितीनुसार, शेखर चरेगावकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटचे आहे. त्यामुळे आता या प्रकरणात शेखर चरेगावकर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.