पुणे : येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचं आंदोलन (Student Protest)सुरुच आहे. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचं दिसून येतंय. मंगळवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी फोनवरुन संवाद देखील साधला होता. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन कायम ठेवलंय.
दोन दिवसापासून विद्यार्थ्याचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आंदोनस्थळी पोहोचले होते. त्यांनी फोनवरुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. सध्या विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत लेखी आंदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रातून चार खासदारांना संसदरत्न, राष्ट्रवादीचे दोन तर भाजपच्या दोन खासदारांचा समावेश
या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळानं आपल्यासोबत यावं असंही शरद पवारांनी सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळं तुमची बाजू मांडणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले.
पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचं शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या शिष्टमंडळात कोण असणार याची नावंही विद्यार्थ्यांनी जाहीर केली. यावेळी शरद पवारांना विद्यार्थ्यांनी जागा करून दिली आणि शरद पवार विद्यार्थी आंदोलनच्या मधोमध पोहोचले. त्यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.