Download App

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

पुणे : पुण्यातील बालगंधर्व चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांकडून (mpsc student protest) पुन्हा आंदोलन केले जात आहे. टायपिंग स्किल टेस्टमध्ये (Typing Skill Test) आयोगाने बदल केला आहे. त्या बदलाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्य परीक्षा परिषद नियमानुसार स्किल टेस्ट घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

बालगंधर्व रंगमंदिर चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन (mpsc student strike) करत आहेत. लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक कोशल्य चाचणीबाबत हे आंदोलन होत आहे. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.

यापूर्वी देखील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. आता पुन्हा एकदा एमपीएसच्या विद्यार्थ्यांनी टायपिंग स्किल नियमात केलेल्या बदलाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे ही विद्यार्थांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच रस्त्यावर उतरु, असा इशारा विद्यार्थांनी दिला आहे.

लोकसभेपूर्वी पुन्हा राज्यात राजकीय भूकंप?; काँग्रेसचा बडा नेता देणार धक्का

दरम्यान, जानेवारी महिन्यात एमपीएसचा नवीन अभ्यासक्रम 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य करत नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचे अश्वासन दिले होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होते.

Tags

follow us