एमपीएससी अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्यासाठी परीक्षार्थी रस्त्यावर; दिपकेंसह मविआचा आंदोलनाला पाठिंबा

MPSC Students protest एमपीएससीच्या पेपरफुटीची चर्चा आहे. याविरोधात आता पुण्यामध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

MPSC Students Protest

MPSC Students Protest

MPSC Students protest in Pune for resignation of MPSC Chairman and Secretary : गेल्या काही दिवासांपासून राज्यामध्ये एमपीएससीच्या पेपरफुटीची चर्चा आहे. याविरोधात आता पुण्यामध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एमपीएससी अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला महाविका आघाडीसर सीजेपीच्या अभिजीत दिपके यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला.

अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंसह 4 जण ताब्यात; परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांची कारवाई

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षार्थी आणि सरकारी नोकरीची तयारी करणारे तरुण सहभागी होण्याची शक्यता आहे. कथित पेपरफुटीची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. या घटनेमुळे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सरकारने स्पष्ट आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.

दिल्लीत इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; इमारत मालकावर गुन्हा दाखल

या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीची चर्चा असून, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनेही विद्यार्थ्यांच्या मोर्चाला समर्थन जाहीर केले आहे. आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदमही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अभिजीत दिपके यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

इतकंच वाटतंय तर देशात राहायला या; मोदींचं कौतुक करणाऱ्या NRI महिलेची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न राजकीय रंगात रंगवू नये, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना आपल्या समस्या आणि मागण्या मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा तातडीने राजकीय हेतूंसाठी वापर करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असले, तरी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक आणि सरकार यांच्यात अद्याप एकमत झालेले नसल्याने हा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.

Exit mobile version