Pune Crime: एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. (mpsc-third-rank-darshana-pawar-suspected-death)
दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. यंदाच्या एमपीएससीच्या निकालामध्ये तिचा तिसऱ्या क्रमांक आला होता. वन अधिकारी म्हणून तिला पोस्ट मिळाली होती.
‘स्टंटबाजी करू नका’; श्रीरामपूर बंद ठेवणाऱ्यांना राधाकृष्ण विखेंनी सुनावले !
पुण्यातून आठ दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. २६ वर्षीय दर्शनाचा शोध घेण्यात येत होता. रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
कॉंग्रेसला विरोध करून गडकरींचा मोदी, शाहांना खूश करण्याचा प्रयत्न; कॉंग्रेस नेत्याची खोचक टीका
मित्रासोबत गेली पण परतलीच नाही
मागील रविवारी ती मैत्रिणीला सिंहगड येथे ट्रेकिंगसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. तिच्याबरोबर एक मित्रही होता. 12 जून दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटुंबाने शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटुंबाने सिंहगड रोड पोलिस हरविल्याची तक्रार नोंदविली होती.
मृतदेहाजवळ मोबाइल आढळला
पोलिसांनी तरुणीचा व त्या तरुणाचा शोध सुरू केला होता. दोघेही बेपत्ता झाले. या दोघांचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला आहे. आज राजगड किल्ऱ्याच्या पायथ्याला झाडांमध्ये दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मोबाइल व इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. तिचा मित्र बेपत्ता आहे.या घटनेने पुण्यात जोरदार खळबळ उडाली आहे.