कॉंग्रेसला विरोध करून गडकरींचा मोदी, शाहांना खूश करण्याचा प्रयत्न; कॉंग्रेस नेत्याची खोचक टीका

कॉंग्रेसला विरोध करून गडकरींचा मोदी, शाहांना खूश करण्याचा प्रयत्न; कॉंग्रेस नेत्याची खोचक टीका

Gaurav Vallabh : कर्नाटकातील काँग्रेस (Congress) सरकारने मागील भाजप (BJP) सरकारचे काही वादग्रस्त निर्णय रद्द केले. कॉंग्रेसने शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित धडे वगळण्याचा निर्णय घेतला. या विरोधात भाजपने आता आघाडी उघडली असून या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध आहे. भाजप सरकारच्या काळात या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. (Gaurav Vallabh critisize Nitin Gadkari over from chapter sawarkar and hegadewar)

काँग्रेस नेते गौरव वल्लभ म्हणाले की, भारत आणि कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी हेडगेवार आणि सावरकरांऐवजी डॉ. भीमराव आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचे वाचन केले पाहिजे. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेची विचारधारा पुढे नेणाऱ्या सावरकर आणि हेडगेवार यांची विचारधारा मुलांना शिकवू शकत नाहीत.

महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे हा भारताचा सुपुत्र असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच दिवसांपूर्वी म्हटले होते. ती विचारधारा आपण पुढे कशी नेऊ शकतो? इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीची विचारधारा पुढे नेणार का? हेडगेवार आणि सावरकरांची विचारधारा ही भारताची विचारधारा नाही. “पीएम मोदी आणि अमित शहा यांना नितीन गडकरी आवडत नाहीत, त्यामुळे गडकरी हे मोदी, आरएसएसला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका वल्लभ यांनी केली.

तुमच्या सत्तेच्या मस्तीचा फुगा फोडायला मला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा 

काय म्हणाले गडकरी?

कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यावरील धडे काढून टाकण्यचा निर्णय घेतला. त्याच्यावर नितीन गडकरी यांनी टिप्पणी केली. गडकरी शनिवारी (१७ जून) नागपूरात वि.दा. सावरकर यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करताना बोलत होते. यावेळी ते म्हणाले, डॉ. हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित अध्याय शालेयअभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही. सावरकर हे समाजसुधारक होते आणि ते आमच्यासाठी आदर्श आहेत, असे गडकरी म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube