तुमच्या सत्तेच्या मस्तीचा फुगा फोडायला मला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

तुमच्या सत्तेच्या मस्तीचा फुगा फोडायला मला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Uddhav Thackeray : सत्तेच्या लालसेपोटी लाचार मिंधे भाजपसोबत गेले आहेत. मला संताप या गोष्टीचा येतो, त्यांची नेते आपल्या घरात येऊन फोडाफोडी करत आहेत. त्याला मला एकच सांगायचं आहे, स्टॅलिन (Stalin) यांनी फक्त इशारा दिला. आम्ही तो महाराष्ट्रात आणू. तुमच्या सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला. ( Uddhav Thackeray warning BJP, Modi should go to Manipur once)

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटानं आज वरळीत शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात बोलतांना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, तुम्हाला सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर ती मस्ती मणिपूरमध्ये दाखवा, ईडी, सीबीआयचे लोक तिथे पाठवा. अमित शहा यांनाही मणिपुरमध्ये लोक जुमानत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला जाण्यास तयार आहेत, पण मणिपुरला जायला तयार नाहीत. माझ्या देशाचा एक भाग धगधगत असतांना पंतप्रधान परदेश वाऱ्या करतात, हे निंदनीय आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध मोदींनी थांबवलं, अशी एक भाकड कथा आहे. मणिपुरला शांत करून ही भाकड कथा पंतप्रधान मोदींनी खरी करुन दाखवावी. त्यांनी एकदा मणिपूरला जाऊन दाखवावचं, असं थेट आव्हान ठाकरेंनी दिलं.

Uddhav Thackeray : अब्दालीचा किस्सा ऐकवत उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकारचा डाव 

उद्धव ठाकरे म्हणाले, ठाण्यात महिला गुंड बनल्या आहेत. महिला नेत्यांवर हल्ले होत आहेत. आता इथून पुढे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. शिवसेने पुढील हे आव्हान पहिलं नाही, याआधीही अशी आव्हानं आम्ही पाहिले आहेत, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, आणि परवा गद्दार दिन आहे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

“भाजपला शिवसेनेचे महत्त्व कळलेले नाही, उद्या तुम्ही सत्ता गमावाल तेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसेल. भाजपची सत्ता नव्हती तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता देशात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशावर प्रेम करणाऱ्या लोकांची एकजूट होईल, मी बिहारला जाणार आहे, मला नितीशकुमारांनी बोलावले आहे, पूर्वी भाजप मातोश्रीवर यायचा, पण आता विरोधी पक्ष मातोश्रीवर येतात, भाजपला शिवसेनेचे महत्त्व कळत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube