Muralidhar Mohol meet Amit Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला. पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रिय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची आज भेट घेतली. यावेळी ‘पुण्यातही मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही अमित ठाकरेंनी दिली.
तमन्ना भाटियाचा हॅपी डेज आणि पैया पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ दिवशी होणार रिलीज
अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांची आज मुरलीधर मोहोळ यांची मनसेच्या पुणे शहर कार्यालयात सदिच्छा भेट घेलती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रीय असेल, अशी ग्वाही दिली. यावेळी ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोहोळ यांचे अभिनंदन केले. या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस बाबू वागस्कर यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर; महायुतीसाठी ठरणार गेमचेंजर ?
या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार
या भेटीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, मनसेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द दिला. त्यांच्याशी प्रचाराच्या रणनीतीबाबतही चर्चा झाली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. विजय आणखी सोपा झाला आहे. राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आणि मनसेची स्वतंत्र ताकद संपूर्ण पुणे शहरात आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. साहजिकच आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करून मोठा विजय साकारू’.
वागसकर म्हणाले, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, अमित ठाकरे हे सर्व शहरांचा दौरा करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुण्यात आमचे सर्व पदाधिकारी आणि संघटकांशी चर्चा केली. त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदजवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांच्या प्रचारात आम्ही एकदिलान सहभागी होणार असल्याचे वागसकर यांनी सांगितले.