पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असतानाच आता राष्ट्रवादीही या जागेसाठी इच्छूक असल्याचं बोललं जातंय. असं असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे लोकसभेच्या जागेबाबत मोठं विधान केलं आहे. काँग्रेस आत्तापर्यंत मन मोठंच करत आलंय, सध्या निवडणुका लागलेल्या नाहीत त्यामुळे यावर चर्चा नको, असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. नाना पटोले यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?
पुणे लोकसभेचे खासदार गिरिष बापट यांच्या निधनानंतर आत पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे वारे फिरु लागले आहेत. कसब्यानंतर आता पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुढील काही दिवसांत पोटनिवडणूक होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच सत्ताधारी नेत्यांकडून कसब्यानंतर आता महाविकास आघाडी पुणे लोकसभेची जागा सोडणार का? मन मोठं करणार का? असा सवाल राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते नाना पटोलेंनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे.
सुप्रीम कोर्टाचे केंद्र-गुजरात सरकारवर ताशेरे, ‘आज बिल्किस, उद्या आणखी कोणी…’
दरम्यान, कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक चुरशीची ठरली होती. कसब्यात टिळक कुटुंबियांना डावलून भाजपने हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवले होते.
तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पोटनिवडणुकीत पिंपरी चिंचवडमधून भाजपच्या आश्विनी जगताप तर कसब्यातून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाला.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिव्यांगासाठी पदोन्नतीत 4 टक्के आरक्षण…
यादरम्यान, पुणे लोकसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिष बापट यांची प्रकृती बरी नसतानाही ते भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उतरले होते. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांचं निधन झालं होतं.
गिरीष बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभेसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता असून अद्याप तरी या पोटनिवडणुकीबाबतीत कोणती चर्चा झाल्याचं समोर आलेलं नसून पुढील काळात पोटनिवडणुकी कोणता पक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.