Download App

नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा; वळसे पाटलांसाठी झिरवळांची साद

नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा, या शब्दांत आंबेगाव मतदासंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांसाठी नरहरी झिरवळांनी साद घातलीय.

Narhari Zirwal News : नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा, या शब्दांत आंबेगाव मतदासंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांसाठी (Dilip Walse Patil) नरहरी झिरवळांनी साद घातलीयं. विधानसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरु असून आंबेगावात आज नरहरी झिरवळांच्या उपस्थितीत दिलीप वळसे पाटलांची प्रचारसभा पार पडली. या सभेत नरहरी झिरवळांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

रेल्वेमार्गासाठी मी संभाजीरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभा ; भर सभेत नितीन गडकरींनी दिली ग्वाही

नरहरी झिरवळ म्हणाले. विधानसभेत मी गेलो तेव्हा मी नवखा होतो. आपले कामं करुन घेण्यासाठी मागे बसणारे उमेदवार विधानसभेत पाठवायचे की पुढे बसणारे पाठवायचे आहेत, याचा विचार करावा लागेल. मी नवीन होतो तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे मागे बसायचो आता, नव्या माणसाचे प्रेशर किती पुन्हा एबीसीडी करायची की आता पीएचडी करायची. दिलीप वळसे पाटील पीएचडीच्याही पुढे गेलेले आहेत. त्यामुळे नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा, अशी साद नरहरी झिरवळांनी मतदारांना घातलीयं.

Video : निलंग्याला काम करणारा प्रामाणिक नेता मिळालाय; संभाजी पाटलांना साथ द्या -नितीन गडकरी

तसेच मला नेता बनवायला अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मला उपाध्यक्ष केलं, त्यानंतर सरकार उलटपालटं झालं तेव्हा मला वाटलं 140 चा रुम साफ करुन ठेवावं लागेल, इथून जावं लागणार पण या नेत्यांनी आदिवासी चुकला असेल तो बरोबर असेल त्याला तिथंच त्या जागेवर ठेवलं. सर्वांना वाटत होतं झिरवळांना काढतील पण मला उपाध्यक्ष ठेवलं. आदिवासी माझा म्हणण्याची धमक फक्त अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्येच असल्याचं नरहरी झिरवळांनी स्पष्ट केलंय.

प्रदेशनिहाय कोणाला मिळणार किती जागा?, निकालापूर्वीच मुख्यमंत्री ठरला? सर्व्हेतून माहिती समोर

आदिवासी समाजातही आता सुशिक्षित तरुण वर्ग आहे. चांगलं काय वाईट काय हे त्यांना चांगलं समजतं. त्यासाठी माझी विनंती आहे. आपण दादांच्या फडणवीस शिंदेंच्या नेतृत्वात चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. आदिवासींचं आरक्षण काढणार संविधान बदलणार असं सांगण्यात आलं. संविधान बदलायला तिथं आमच्याच मूर्म आहेत त्या कसंकाय बदलू देतील. लोकसभेला आपल्याला फसवलं गेलं.नंतर आता आपल्याला पस्तावा आला, गावागावात गटतट आहे हे स्थानिक बांधावर असतील. रेशन दुकानावर असेल पण हे गावात,राज्य हे गाव नाही समजाहितासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन झिरवळांनी केलंय.

follow us