प्रदेशनिहाय कोणाला मिळणार किती जागा?, निकालापूर्वीच मुख्यमंत्री ठरला? सर्व्हेतून माहिती समोर

  • Written By: Published:
प्रदेशनिहाय कोणाला मिळणार किती जागा?, निकालापूर्वीच मुख्यमंत्री ठरला? सर्व्हेतून माहिती समोर

Election Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून, राजकीय तापमान वाढत चालले आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांनी (Survey ) प्रचारात जोरदार झुंज सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी मॅटराइज सर्व्हेने दिलेल्या अंदाजामुळे महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) या दोन्ही गटांचे भविष्य कसे असू शकते, याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

महायुती की महाविकास आघाडी?, कोण येणार सत्तेत?; च्या सर्वेक्षणाने थेट आकडेवारीच मांडली

महाविकास आघाडीची स्थिती

मॅटराइज सर्व्हेनुसार, महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळू शकतात, तर विरोधक असलेल्या महाविकास आघाडीला केवळ १०६ ते १२६ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपा नेतृत्वाखालील महायुतीला सत्ता मिळण्याची संधी मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे हे जनतेच्या पसंतीत आघाडीवर आहेत. सर्व्हेनुसार ४० टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदी पसंती दर्शवली आहे, तर उद्धव ठाकरे यांना २१ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना १९ टक्के जनतेने पसंती दिली आहे.

प्रदेशनिहाय कोणाच्या किती जागा?

पश्चिम महाराष्ट्र: ७० पैकी ३१ ते ३८ जागा आणि ४८ टक्के मतांचा वाटा

विदर्भ: ६२ पैकी ३२ ते ३७ जागा आणि ४८ टक्के मतांचा वाटा

मराठवाडा: ४६ पैकी १८ ते २४ जागा आणि ४७ टक्के मतांचा वाटा

ठाणे-कोंकण: ३९ पैकी २३ ते २५ जागा आणि ५२ टक्के मतांचा वाटा

मुंबई: ३६ पैकी २१ ते २६ जागा आणि ४७ टक्के मतांचा वाटा

उत्तर महाराष्ट्र: ३५ पैकी १४ ते १६ जागा आणि ४५ टक्के मतांचा वाटा

महाविकास आघाडी बाबतीत सर्व्हेने पुढील अंदाज वर्तवला आहे:

पश्चिम महाराष्ट्र: ७० पैकी २९ ते ३२ जागा आणि ४० टक्के मतांचा वाटा

विदर्भ: ६२ पैकी २१ ते २६ जागा आणि ३९ टक्के मतांचा वाटा

मराठवाडा: ४६ पैकी २० ते २४ जागा आणि ४४ टक्के मतांचा वाटा

ठाणे-कोंकण: ३९ पैकी १० ते ११ जागा आणि ३२ टक्के मतांचा वाटा

मुंबई: ३६ पैकी १० ते १३ जागा आणि ४१ टक्के मतांचा वाटा

उत्तर महाराष्ट्र: ३५ पैकी १६ ते १९ जागा आणि ४७ टक्के मतांचा वाटा

सर्वेक्षणाची पद्धत आणि डेटा

मॅटराइजच्या या सर्वेक्षणात १० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील १,०९,६२८ लोकांची मते घेतली गेली आहेत. यामध्ये ५७ हजारांहून अधिक पुरुष, २८ हजार महिला आणि २४ हजार युवकांचा समावेश आहे. सर्व्हेने विविध वयोगट, लिंग आणि सामाजिक स्तरावर मतदारांची मते घेतली आहेत, ज्यामुळे सर्व्हेचे अंदाज अधिक समर्पक ठरू शकतात.

महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यावर परिणाम

या सर्व्हेतील आकडेवारीनुसार महायुतीला राज्यात मोठा जनाधार मिळत असल्याचे दिसते. विशेषतः विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे-कोंकण या भागांमध्ये महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, एमव्हीएला काही भागांमध्ये आघाडी असूनही संपूर्ण राज्यात बहुमत मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यामुळेच आगामी निवडणुकीत कोणत्याही गटाला सहज विजय मिळणार नसल्याचे स्पष्ट होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube