Mood of the Nation survey : आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ?
Mood of the Nation survey : नुकत्याच देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आलं. लोकसभेनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अद्याप 2 महिने शिल्लक असतांना सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली. दरम्यान, राज्यातील जनतेचा मूड काय आहे? हे आता समोरं आलं. आज तक या वृत्तवाहिनीने केलेल्या मूड ऑफ नेशनच्या सर्व्हेत (Mood of the Nation survey) राज्यातील जनतेला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व्हे 15 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान करण्यात आला.
लोकसभेसाठी भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीऐवजी महाविकास आघाडीला पसंती दिली. आता तीन महिन्यांनंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार, आड निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठा फटका बसू शकतो. कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
मविआची टक्केवारीत वाढ…
तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फायदा होताना दिसत आहे. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी 43.71 टक्के होती. पण आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी 44 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
आज लोकसभा झाल्यास काँग्रेसला सर्वाधिक जागा…
दरम्यान, आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली, तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजयाच विजय होत असल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक फायदा होऊ शकतो. कारण त्यांच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपच्या जागाही सर्व्हेत वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील चारही प्रादेशिक पक्षांना मात्र, काहीसा फटका बसल्याचे दिसत आहे. पण असं असलं तरी आज जरी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचीच राज्यात सरशी होत असल्याचं दिसून येतं.
काँग्रेसला 16 तर भाजपला 12 जागा
या सर्व्हेनुसार, आज राज्यात लोकसभा निवडणुका झाल्या तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळू शकतात. त्यांना राज्यात एकूण 16 जागा मिळतील. भाजपला 12 जागा मिळतील. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन्ही पक्ष 14 जागा जिंकू शकतात. तर महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना केवळ 6 जागाांवर वियय मिळू शकतो, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर 35 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर 31 टक्के लोकांनी काही प्रमाणात समाधान तर 28 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली.
34 टक्के लोकांची सरकारच्या कारभारावर नाराजी
मूड ऑफ द नेशननुसार 25 टक्के जनता महायुती सरकारच्या कारभारावर पूर्णपणे समाधानी आहे. तर 34 टक्के लोकांनी सरकारच्या कामकाजावर समाधानी असल्याचे म्हटले आहे. मात्र 34 टक्के लोकांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. यावरून राज्य सरकारच्या कारभाराबाबत सर्वसामान्यांचे मत फारसे चांगले नसल्याचे दिसून येते.
राज्यातील खासदारांच्या कामगिरीवर 32 टक्के समाधान व्यक्त करण्यात आलं. तर 22 टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केली. 26 टक्के लोक आमदारांच्या कामावर समाधानी आहेत तर 27 टक्के लोक असमाधानी आहेत.
मोदींना पंतप्रधान मोदीच हवेत
राज्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी प्राधान्य दिले आहे. त्यांना 46 टक्के पाठिंबा मिळाला. तर 34 टक्के लोकांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे.