Narayan Rane Vs Uddhav Thackeray : ठाकरे फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते… त्यांचा पक्ष संपला!

Narayan Rane Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहिले. ते पण मातोश्रीचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काहीही अस्तित्व राहिले नाही. त्यांचा पक्ष संपलेला आहे. आता त्यांच्याकडे फक्त मातोश्री एवढंच काय ते राहिले आहे, अशी सडकून टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर […]

Narayan Rane

narayan rane

Narayan Rane Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहिले. ते पण मातोश्रीचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काहीही अस्तित्व राहिले नाही. त्यांचा पक्ष संपलेला आहे. आता त्यांच्याकडे फक्त मातोश्री एवढंच काय ते राहिले आहे, अशी सडकून टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने राणे यांनी बापट यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Vasant More पुन्हा नाराज : कसब्यातील ‘बॅनर’वरून दिला ‘हा’ इशारा – Letsupp

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे राम नवमी निमित्त मुंबईत मातोश्रीजवळ शेरणी म्हणून पोस्टर लावले आहेत. पोस्टर लावून उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे का, असा प्रश्न नारायण राणे यांना विचारला असता… ते म्हणाले की, मला त्या उद्धव ठाकरे यांच्या बद्दल काही नको विचारू आता. उद्धव ठाकरे यांचे आता काहीच अस्तिव राहिले नाही. ते फक्त अडीच वर्षे आणि तेही मातोश्रीचे मुख्यमंत्री होते. आता तेही नाही. त्यांच्याकडे फक्त मातोश्री नावाचा बंगला राहिला आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. त्यांचा पक्ष पूर्णपणे संपला आहे. आता खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे ठाकरे गट, मातोश्री एवढाच महाराष्ट्र आहे का, मला तुम्ही ठाकरेंबाबत काही विचारू नका. पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत विचारा मला.

(245) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube

Exit mobile version