Download App

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र…

Lalit Patil Drug Case : ड्रग्स प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना नाशिकमधून निनावी पत्र (Anonymous letter)पाठवण्यात आले आहे. या निनावी पत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये ललित पाटील आणि एमडी ड्रग्स प्रकरणाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र सकल हिंदू समाज या नावाने आले आहे.

मणिपूर हिंसाचारात बळी गेलेल्या नागरिकांवर 7 दिवसाच्या आत अंत्यसंस्कार करा; SC चे आदेश

सकल हिंदू समाज नाशिक या नावाने आलेल्या पत्रात ललित पाटील आणि एम डी ड्रग्स प्रकरणाबद्दल काही धक्कादायक खुलासे असल्याची माहिती समजली आहे. या पत्रामध्ये ललित पाटील प्रकरणातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि काही लोकप्रतिनिधी यांची देखील नावं असल्याची माहिती समजते आहे.

Abdul Sattar : मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ‘त्या’ निर्णयांबद्दल सत्तारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

ललित पाटील प्रकरणातील हफ्ते कोणाला जात होते? याचा देखील पत्रात उल्लेख असल्याची माहिती समजते आहे. या पत्रामध्ये ड्रग्स प्रकरणात काही कोड वर्डचाही वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्स प्रकरणात यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाशिकमध्ये अंमली पदार्थाची निर्मिती आणि त्याची राजरोसपणे तस्करी होत असल्याचे समोर आल्यावर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावरुन विरोधकांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका सुरु केली.

सुषमा अंधारे यांनी ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी भुसे यांनीच दबाव आणल्याचा सूर आरोप करत त्यांच्या फोनची माहिती तपासावी, अशी मागणी देखील केली. अंधारे यांच्या आरोपांचं मंत्री दादा भुसे यांनी खंडण देखील केलं होतं. काही दिवसांपूर्वी हा विषय चांगलाच तापल्याचं देखील पाहायला मिळालं.

Tags

follow us