Lalit Patil Drugs Case प्रकरणी ससूनच्या डीनला सहआरोपी करा; सुषमा अंधारेंची मागणी
Lalit Patil Drugs Case : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील (Lalit Patil Drugs Case ) आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ड्रग्स तस्करी प्रकरणात ससूनच्या डीनला सहआरोपी करा अशी मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्स तस्करी प्रकरणात ससूनच्या डीनला सहआरोपी करा अशी मागणी करताना अंधारे म्हणाल्या, ससूनचे अगोदरचे अधिष्ठाता काळे आणि आताचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचं निलंबन करून त्यांची सहआरोपी म्हणून चौकशी झाली पाहिजे. कारण ते पदावर असताना तपासावर प्रभाव टाकू शकतात.
‘तिच्या’ धाडसाला तोड नाही; हमासच्या 24 दहशतवाद्यांना कंठस्नान, जगभरात होतंय कौतुक
गेल्या 9 महिन्यात ते ललित अनिल पाटील याला काय ट्रीटमेंट देत होते. त्याच्या कोण-कोणत्या तपासण्या, शस्त्रकिया, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ही सगळी माहिती संजीव ठाकूर यांनी दिली पाहिजे. अशी मागणी अंधारे यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी दादा भुसेंवर देखील या प्रकरणी पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक उरतील तर शरद पवारांचा पक्षही किंचित…; बावनकुळेंचा हल्लाबोल
दादा भुसेंवर सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता. की, ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांनी रुग्णालयात फोन केला होता. त्यावर दादा भुसेंनी स्पष्टीकरण दिले होते. की, जगातील कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझी चौकशी करायची असेल तर करा. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही चौकशी करा, मी चौकशीला तयार असून माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा अंधारे यांनी त्यांना या प्रकरणी सवाल विचारला आहे.
काय आहे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण?
काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह नाशिकचे पोलिसही ललित आणि भूषण पाटील या दोघांच्या मागावर होते. साकीनाका पोलिसांनी 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्या प्रकरणामध्ये भूषण आणि ललित हे दोघेही आरोपी होते. ललित अन् भूषण हे दोघेही एमडी ड्रग्ज बनवत होते. आता उत्तर प्रदेशमधील वारानसीतून भूषण पाटीलला अटक केली आहे. भूषणचा ड्रग्ज बनवण्याचा कारखाना होता.
Mouni Roy : क्रॉप टॉपमध्ये मौनीच्या दिलखेच अदा
ललित हा पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन समोर आले होते. नाशिकमध्ये ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटीलने ड्रग्ज कारखाना उभा केला. नुकताच त्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. असं असलं तरी नाशिकमधील पोलिसांना याची काहीच माहिती नव्हती, त्यामुळे याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
‘…अन् आता मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात’; सुप्रिया सुळेंचा घणाघात
नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काही दिवसांपूर्वीच 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
Nitesh Rane : रत्नागिरी भाजपला हवंय का? राणेंच्या ऑफरने शिंदे गटात खळबळ
शिंदे गावात सुरु असलेला ड्रग्जचा कारखाना एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता. पोलिसांनी शेडचा पत्रा कापून ड्रग्जच्या कारखान्यात प्रवेश केला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्याचे साहित्य पोलिसांना आढळून आले होते. सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे.
https://youtu.be/_GixPkoXMj0?si=yUYSiMBX1ZBWYdqg
दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर ड्रग्जच्या विळख्यात तर सापडलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या या ड्रग्ज प्रकरणाचा पोलिसांकडून देखील तपास सुरु आहे.