Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील राजकारणाच्या सद्यस्थितीवर भाष्य करत अजित पवार (Ajit Pawar) यांचे व्यंगचित्र काढले आहे. चित्र पूर्ण होताच म्हणाले, “ए तू चूप बस..” असे त्यावर बोलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिनानिमित्त (National Cartoonist Day) कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या वतीने बालगंधर्व (Balgandharva) रंगमंदिरात जगभरातील व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
हा उदघाटन शुक्रवारी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. त्यांना रत्नागिरीला जायचे असल्याने त्यांनी थोडावेळ काढत या ठिकाणी जाताजाता भेट दिली आहे. व्यासपीठावर उभ्याने त्यांनी सर्वांशी संवाद साधला आहे, म्हणाले हल्ली अतिव्यस्त असल्याने मला व्यंगचित्र काढायला खरोखर वेळ मिळत नसल्याचे त्यांनी येवले सांगितले. तसेच माझे पहिले प्रेम व्यंगचित्र आणि दुसरे राजकारण आहे.
Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव
मी आता निघत आहे कारण मला पुढे रत्नागिरीला जायच आहे. पण कार्टुनिस्ट कंबाईन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला की, जाता जाता महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकिय स्थितीवर एक व्यंगचित्र काढा. त्यामुळे मी हा व्यंगचित्र काढला आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कॅनव्हास बोर्ड दिला गेला होता. मग राज यांनी उभारूनच घाईत काय काढू आसा विचार करत काळा मार्कर हातात घेतला आणि क्षणभर विचार केला.
जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन….; फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण
परंतु काही क्षणातच पुढच्या सेकंदाला त्यांच्या कुंचल्यातून कागदावर प्रकटले ते राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार. मागील काही दिवसाखाली शरद पवारांनी केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अजित पवारांनी त्या दिवशी दिवसभर केलेल्या प्रकारावरून हे व्यंगचित्र काढलं गेलं आहे. याकडे न्याहाळत ते लोकांना म्हणाले, आता पुढे काय लिहू तुम्हीच सांगा….? गप्प बसा असे लिहू का ? त्यावर टाळ्या पडल्या आणि तेवढे लिहून राज ठाकरे सर्वांचा निरोप घेत रत्नागिरीला रवाना झाले आहेत.