Ncp-BJP Crisis Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकरांची (Amol Balwadkar) सातत्त्याने होत असलेली टीका आणि विरोधात भूमिका घेतल्याप्रकरणी अखेर पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच पत्र लिहित बालवडकरांच्या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केलीयं. अमोल बालवकर यांची भूमिका अहंकारी, असंसदीय, हकेखोरपणे वर्तन करणारी असल्याचा आरोप करीत बिडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीयं.
विकासकामांसाठी आमदार क्षीरसागरांचा पाठपुरावा; मंत्री शिवेंद्रराजे, गोरेंकडे रस्ते, तिर्थक्षेत्र विकासाची मागणी
बिडकर पत्रात म्हणाले की, अमोल बालवडकर सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपूरे यांच्यावर
सातत्याने टीका करीत आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर सार्वजनिक टीका करणे अयोग्य असून बालवकडकरांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये
चुकीचा संदेश पोहोचला जात असल्याचं बिडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केलेले आहे. बिडकर यांनी बालवडकरांच्या विधानांचा निषेध करीत चुकीची टीका
असल्याचं म्हटलं असून ही भाषा अशोभननीय आणि महायुतीच्या हिताला बाधा आणणारी असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. बालवडकर यांच्या भूमिकेमुळे
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचीही चिंता बिडकर यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेत नेमकं काय घडलं?
स्थायी समितीचे सदस्य अमोल बालवडकर यांनी देण्यात आलेला 15 कोटी रुपयांचा विकासनिधी शून्य करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मतदानाच्या जोरावर मंजूर करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानेच निधी शून्य करण्यात आला असल्याचा दावा अमोल बालवडकर यांनी केला. सभागृहात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. आपली मैत्री राज्यात असेल परंतू पुण्यात नाही यापुढे आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, अशी भूमिका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी घेतल्याचं दिसून आलं. भाजपच्या नेत्यांकडून अशी भूमिका घेण्यात आल्यानंतर असे करणार असाल तर यापुढे सर्व कामे नियमानित झाली पाहिजेत. ती नियमानेच कशी होतील. याकडे आम्ही लक्ष ठेवू या शब्दांत निलेश निकम यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद सुरु असतानाच स्थायी समितीचे सदस्य अमोल बालवडकर यांनी या प्रस्तावावर बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली. त्यावर महापौर मंजुषा नागपुरे यांनी नकार देत मतदान घेण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये धुमश्चक्री झाल्याच्या घटनेनंतर आता गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून अमोल बालवडकर यांच्या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली आहे. बिडकर यांनी पवार यांना पत्र लिहिल्यानंतर आता नगरसेवक अमोल बालवडकर कोणती भूमिका घेणार याकडं सर्वांचच लक्ष लागून राहिलंय.
