Sharad Pawar Z Plus Security : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. राज्यातील घडामोडींचा विचार करून शरद पवार यांची सुरक्षा वाढविण्यात येईल असा अंदाज आधीच व्यक्त केला जात होता. शरद पवार यांना सध्या राज्य सरकारकडूनही झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे. आता केंद्र सरकारनेही त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर आता शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावरच शंका उपस्थित केली आहे. शरद पवार यांनी काल नवी मुंबई येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, गृह विभागाचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला तीन जणांना झेड प्लस सुरक्षा देण्याय निर्णय सरकारने घेतल्याची माहिती दिली. त्यांना मी अन्य दोन व्यक्तींची नावं विचारली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अशी (Amit Shah) नावं सांगितली. मला कशासाठी ही सुरक्षा दिली असेल याची मला माहिती नाही. पण सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फिरावं लागत आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती काढण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी. या संदर्भात मी लवकरच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय? VIP अन् नेत्यांना किती प्रकारची सुरक्षा, जाणून घ्या डिटेल
दरम्यान, देशातील सर्वात महत्वाच्या व्यक्ती, अधिकारी आणि नेते मंडळींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना खास पद्धतीची सुरक्षा व्यवस्था दिली जाते. या सुरक्षा व्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत. माजी पंतप्रधान, मंत्र्यांना साधारणपणे झेड प्लस सुरक्षा दिली जाते. एसपीजीनंतर झेड प्लस दुसरी सर्वात खास सुरक्षा व्यवस्था आहे. झेड प्लस सुरक्षा कुणाला द्यायची याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जातो. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे झेड प्लस आणि अन्य प्रकारची सुरक्षा व्यवस्था दिली जाते. झेड सुरक्षा दोन प्रकारची असते. एक झेड प्लस आणि दुसरी झेड सुरक्षा. साधारणपणे केंद्रातील वरिष्ठ मंत्री आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा मिळालेली असते.
झेड प्लस सुरक्षेत दहापेक्षा जास्त एनएसजी, एसपीजी कमांडो, पोलीस यांच्यासह एकूण 55 सुरक्षा कर्मचारी असतात. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही यात तैनात असतात. या कमांडोंचं काम संबंधित व्यक्तीची चोवीस तास सुरक्षा करणे हेच असते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही असतात. अतिशय महत्वाच्या व्यक्तींनाच ही सुरक्षा दिली जाते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात असतात आणि हे कमांडो पूर्णपणे प्रशिक्षित असतात. या सुरक्षा व्यवस्थेतील जवान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास कायम तयार असतात. या जवानांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हत्यारे असतात.
“..तर मी स्वतः आंदोलनात उतरणार” MPSC विद्यार्थ्यांना पाठिंबा देत शरद पवारांचा अल्टिमेटम