Download App

कोणत्या जातीचे किती लोक? हे देशाला एकदा कळू द्या; जातनिहाय जनगणनेवरून पवारांचे थेट भाष्य

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On Caste Based Census : बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची (Bihar Caste Based Census Report) आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जातनिहाय जनगणना करणारे बिहार देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या राज्यांमधून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून जातनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. देशात कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे एकदा कळू द्या, असे पवार यांनी म्हटले आहे.

Bihar caste survey: नितीश कुमारांची खेळी 2024 साठी गेमचेंजर?

शरद पवार म्हणाले, देशात कुठल्या जातीची किती लोक आहेत. हे देशाला कळू द्या, त्यासाठी जातनिहाय आकडेवारी समोर आली पाहिजे. यासाठी लोकही आग्रही आहेत. याचा मला आनंद आहे. लोकसभेतही आम्ही याची मागणी करत आहोत. या देशातील जनतेची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ही आमची स्पष्ट मागणी आहे. जातनिहाय लोकसंख्या कळल्यानंतर देशातील, राज्याची सत्ता त्यांच्याशी वापरता येणार आहे. काही लोक आदिवासींना वनवासी म्हणत आहे. या मार्गाने पाठवून पूजा-अर्चा करण्यास सांगत आहेत. हे चुकीचे आहे. आदिवासी हा वनवासी नसून या देशाचा मालक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना? बावनकुळेंनी सांगितलं…

राज्यात मागील अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुखांनीही यासंदर्भात उघडपणे भाष्य केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही आपण राज्य सरकारकडे जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.


देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

जातनिहाय आरक्षणाच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, ओबीसीच्या सर्वेक्षणा संदर्भात आम्ही सकारात्मक आहे. बिहारीचे जातनिहाय आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्याचा काय परिणाम होईल हे बघावे लागणार आहेत. देशात बिहार वगळता कोणत्याही राज्यानेही आकडेवारी जाहीर केलेली नाही. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही अशी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. बिहारने कशा पद्धतीने जातनिहाय आकडेवारी जाहीर केलेली आहे. हीच पद्धत किती बरोबर आहे हे ठरवावे लागणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags

follow us