Download App

आधी दादांचा फोटो हटवला, आता पवारांच्या सभेचे आयोजन; प्रशांत जगताप त्वेषाने मैदानात!

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

पुणे : अजित पवारांच्या बंडामुळे एकीकडे राष्ट्रवादीत अस्थिरतेचे वातावरण असतानाच दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. याची सुरूवात पवारांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यातून केली. येथे पवारांनी मतदारांची माफी मागत माझा अंदाज चुकला सांगत माफी मागितली होती. त्यानंतर आता येत्या 17 ऑगस्टपासून पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात होणार असून, बीड येथे सभा होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी पवारांची पुण्यात सभा घेतली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे.

“हा अहंकार बरा नाही…” : शिस्त पालन समितीकडे पाठ फिरविल्याने शेट्टींचा तुपकरांवर संताप

पवारांच्या सभेसाठी जगतापांचा पुढाकार

येत्या 17 ऑगस्टला शरद पवारांची सभा धनंजय मुंडेचा बालेकिल्ला असणाऱ्या बीड मतदार संघात होणार आहे. या सभेची संपूर्ण जबाबदारी संदीप क्षीरसागर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुण्यात होणाऱ्या सभेसाठी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांनी आपाला फोटो परवानगीशिवाय वापरू नये अशा सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून पवारांच्या फोटोचा वापर केला जात आहे. मंत्रालयातील अजितदादांच्या कार्यालयातही पवारांचा फोटो आहे.पुणे शहर आणि पुणे जिल्हा राष्ट्रावादीचा खास किल्ला मानला जातो. अनेक दिग्गज नेते पवार आणि अजितदादांच्या मार्गदर्शनात तयार झाले आहेत. यातीलच एक नाव म्हणजे प्रशांत जगताप.

तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका

राष्ट्रवादीतील बंडानंतर अनेकजण पवारांची साथ सोडत अजितदादांच्या गोटात सहभागी होत आहेत. परंतु, एकेकाळी अजितदादांचा खास माणूस म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत जगतापांनी अद्यप शरद पवारांची साथ सोडलेली नाही. त्यानंतर आता खुद्द जगतापांनीच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पवारांची पुण्यात सभा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची धाकधूक काहीशी वाढली आहे.

प्रशांत जगताप हे पुण्याचे महापौर राहिले आहेत. तसेच ते सध्या पुणे राष्ट्रावादीचे शहराध्यक्षदेखील आहेत. महापौर राहिल्याने त्यांची शहरातील मतदारांशी नाळ जुळलेली आहे. अजितदादांच्या प्रत्येक पुणे दौऱ्यावेळी जगतापांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे. त्यामुळे त्यांना अजितदादांच्या कामाची आणि रणनीतीची खडा ना खडा कल्पना आहे. याच गोष्टीचा फायदा ते पुण्यातील पवारांच्या सभेसाठी करू शकतात. ज्याचा थेट फायदा
पवारांना होईल असे बोलले जात आहे.

पक्ष अन् चिन्हासाठी अजितदादांना मोदी-शाहांचं बळ; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

कार्यालय हक्कावरून अजितदादांना थेट भिडले जगताप

पवारांसोबत सावली सारखे उभे ठाकलेले प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालवरील हक्कावरून थेट अजितदादांशी पंगा घेतला होता. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार गटाकडून पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दाव ठोकण्यात आला होता. त्यावेळी हे कार्यालय आपल्या नावावर असून, यावर कोणीही दावा करू शकत नाही असे ठणकावले होते. कधी काळी अजितदादांचा शब्ददेखील खाली न पडू देणाऱ्या जगतापांच्या या भूमिकेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच कार्यालयातील अजित पवारांचा फोटोदेखील काढून टाकण्याचे ध्यैर्य जगतापांनी दाखवले होते.

अजितदादांच्या गटाचे भवितव्य जयंत पाटलांच्या हाती… म्हणूनच सुरुय मनधरणी!

टिंगरे-तुपेंची मनधरणी करण्याची जगतापांवर जबाबदारी

दुसरीकडे पवारांच्या पुण्यातील सभेसाठी जगतापांनी अजितदादांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरूवात केलेली असून, सध्या राष्ट्रवादीचे पुणे शहरात दोन आमदार असून, टिंगरेंनी अजित पवारांना साथ दिली आहे. तर, हडपसर विधानसभा मतदारसंघातील चेतन तुपेंनी नेमका पाठिंबा कुणाला हे अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणाऱ्या पवारांच्या सभेपर्यंत टिंगरे आणि तुपेंची मनधरणी करण्यात जगताप यशस्वी होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज