Namdev Jadhav : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा राज्यात तापला असतानाच शरद पवार ओबीसी असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केला होता. त्यांनी एक प्रमाणपत्रही सोशल मीडियावर शेअर केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने शरद पवारांवर टीका करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. आज जाधव पुण्यात असता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांना काळं फासलं.
माढ्यात मोहिते-पाटलांचा डाव; रणजीत नाईक-निंबाळकरांची झोप उडणार!
पवारांवर आरोप करणारे नामदेव जाधव हे आज पुण्यात आले होते. त्यांचा आज भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. मात्र भांडारकर संस्थेने ती परवानगी नाकारली. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कार्यक्रमाला परवानगी देण्यात नाकारण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनासमोर जमले होते. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शाईफेक करून काळ फासलं. कार्यकर्त्यांना थेट जवळ जाऊन त्यांच्या तोंडाला शाई फासली. जाधव यांच्या सोबत सुरक्षारक्षक असतांनाही कार्यकर्त्यांनी जाधवांना काळं फासलं.
World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!
यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो…. नामदेव जाधवांचं करायंचं का, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रात कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांविरोधात वक्तव्य केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले.
कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?
पवारांच्या विरोधात ते वारंवार वक्तव्ये करत आहेत. आमच्यावर कारवाई केली तरी हरकत नाही. हा व्यक्ती शरद पवारांवर कायम टीका करत आहे. आरोप करत आहे. हे कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे. यापूर्वी हा व्यक्ती शरद पवारांच्या पाया पडायला यायचा. त्यांना पुस्तकं द्यायला यायचा. त्यामुळं शरद पवारांविरोधात या व्यक्तीनं वेडीवाकडं विधानं केलेली खपवून घेतली जाणार नाहीत, असं शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांन सांगितलं.