भावाला ईडीची नोटीस, 6 निकटवर्तीय रडारवर; जयंत पाटीलही सोडणार साथ? शरद पवारांचा मोठा दावा

पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करुन ही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Jayant Patil & Sharad Pawar

Jayant Patil & Sharad Pawar

पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करुन ही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. (NCP President Sharad Pawar expressed his belief that Jayant Patil will not leave the party)

मागील काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपसोबत जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनी पुण्यात नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतली असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशात पाटील यांचे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. गत शुक्रवारीच त्यांना नोटीस आल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांचे आणखी काही निकटवर्तीयही ईडीच्या रडारवर आले आहेत, यावर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?

त्या बैठकीत ईडी कारवायांवर चर्चा नाही :

भगत पाटील यांना शुक्रवारी नोटीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार  अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. ही भेट या ईडी नोटिसीच्या अनुषंगाने झाले असल्याचे बोलले जाते. मात्र या भेटीत याविषयावर चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Jailer: थलायवाच्या ‘जेलर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; 4 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच :

भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फटकारलं. ते म्हणाले. संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडीत आम्ही तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही, ही भूमिका स्पष्ट झाल्यावर संभ्रम राहिलेला नाही. एकदा गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करू नका. मी जे सांगत आहे, तेच माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version