Download App

युटर्नचा सिम्बॉल बदलून तुमचा फोटो लावावा का? कोल्हेंचा दादांना थेट सवाल

Amol Kolhe On Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) भोपाळमधील भाषणानंतर अजितदादांनी अशी उभारती घेतली आहे, त्यांचं आजचं भाषण पाहुन आश्चर्यच वाटलं, तुमची अशी भूमिका पाहुन हायवेवरच्या युटर्नचं सिम्बॉल बदलून तुमचा फोटो लावावा का? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच केला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. या प्रवेशादरम्यानच्या सभेत अजितदादांनी अमोल कोल्हेंवर जोरदार निशाणा साधला. त्यावर बोलताना अमोल कोल्हेंनीही दादांचा समाचार घेतला आहे.

मोठी बातमी : अजितदादांना नडणं भोवलं! शिवतारेंना शिंदेकडून निरोपाचा नारळ; आज धडकणार नोटीस

अमोल कोल्हे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी भोपाळमध्ये भाषण केलं होतं. त्यानंतरच अजितदादांना उभारती मिळाली आहे. आज अजितदादांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच भाषण ऐकून आश्चर्यच वाटलं आहे. अजितदादांची आधीची आणि आत्ताची भाषणे पाहिली की आश्चर्य वाटत. आता अजित पवार यांची भूमिका पाहुन हायवेवरील युटर्न सिम्बॉल बदलून अजितदादांचा फोटो लावावा का? असा सवाल अमोल कोल्हे यांनाी केलायं.

होळीच्या दिवशीही ‘योद्धा’चा व्यवसाय मंदावला, दुसऱ्या सोमवारी खात्यात केली इतकी कमाई

तसेच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. कांदा निर्यात उठवण्यासाठी अजितदादांनी काय प्रयत्न केले आहेत. मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं, त्यावर अजितदादांनी अवाक्षरही काढलं नाही, बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक मृत्यूमुखी पडले त्यावर ते बोलत नाहीत. माझा मतदारसंघातील नागरिक भयभीत झालेले असतानाही ते एक अवाक्षरही बोलत नसल्याची सडकून टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

follow us