Download App

“आधी पार्थला तर निवडून आणा” : थेट आव्हान देत विकास लवांडेंनी ठेवलं अजितदादांच्या दुखऱ्या नसेवर बोट

पुणे : अजितदादांनी सांगितलं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. पण आधी पार्थदादा पवारांना (Parth Pawar) तुम्ही मावळमध्ये उभे करा आणि यावेळी तरी निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारु, असे थेट आव्हान देत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ते खेड येथील जाहीर सभेत बोलत होते. (NCP (Sharad Pawar) group spokesperson Vikas Lawande challenged Deputy Chief Minister Ajit Pawar to elect Partha Pawar.)

राष्ट्रवादी (शरद पवार) गट खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यलय असा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु आहे. या दरम्यान, काल (27 डिसेंबर) खेडमध्ये या जाहीर सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मुद्रांक शुल्क दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू, कधीपर्यंत घेता येणार लाभ?

यावेळी बोलताना विकास लवांडे म्हणाले, अजितदादांनी सांगितलं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. पण अजितदादा तुमचा उमेदवारच अजून फिक्स झालेला नाही. तुम्ही याला त्याला उभं राहा म्हणून काड्या करत आहात. पण माझं मत आहे दिलीप वळसे पाटील साहेबांना तुम्ही उभं करा. तुम्ही म्हणाले ना, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग आता दिलीप वळसे पाटील साहेबांनाच उभे करा ना. बघू द्या काय होते, कोणाचा गाडा अकरा सेकंदात जातो.

Pune : “अजितदादांविरोधात कोर्टात जायची तयारी ठेवा” : चंद्रकांतदादांची पदाधिकाऱ्यांना आक्रमक सूचना

दिलीप वळसे पाटील विरुद्ध अमोल कोल्हे, होऊन जाऊ दे बारी. हाय का हिंमत बघू द्या. लढाच. पण त्याही आधी पार्थदादा पवारांना तुम्ही मावळमध्ये पुन्हा उभे करा आणि यावेळी तरी निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारु, विकासाच तर तुम्ही काही करणारच नाही, दिल्लीत वट आहे तर आमच्या कांद्याचा प्रश्न सोडवा, 20 हजार मुली गायब आहेत, तो प्रश्न सोडवा, आमच्या महिला कुस्टीपटूंच्या डोळ्यात अश्रू पुसायला. पाठवा ना रुपाली चाकणकरांना. बघू त्या डोळ्यातील अश्रू पुसतात का? असे थेट आव्हानही लवांडे यांनी अजित पवार यांना दिले.

follow us