Download App

पुण्यात NIA ची मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेत भरती करणाऱ्या प्रसिध्द डॉक्टरला अटक

  • Written By: Last Updated:

Pune News: राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. ISIS च्या भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला NIA अधिकाऱ्यांनी पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने ISIS च्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. एनआयएने सांगितले की, झडती दरम्यान, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. (Nia-arrested-pune famous doctor-isis-module-case

कोंढवा परिसरात छापा टाकून डॉ.अदनान अली सरकार (43) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कोंढवा येथील घरातून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हा डॉक्टर पुण्यातील तरुणांना प्रेरित करून आणि दहशतवादी संघटनेमध्ये भरती करत असल्याचे समोर आले आहे. आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणे ही याची मुख्य जबाबदारी होती. महाराष्ट्र हे मॉडेल पोहोचण्यात डॉक्टर अदनान अली याचा मोठा हात होता.

संतापजनक: वसतिगृहाच्या केअरटेकरनेच केला मुलींवर लैंगिक अत्याचार; जळगावमधील धक्कादायक घटना

या आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)/ Daesh/ इस्लामिक स्टेट इन खोरासान यांसारख्या विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या ISIS च्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याचं समोर आलं. एनआयएच्या तपासानुसार आरोपी अदनाली सरकार हा भारत सरकारविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत होता.

आता चित्रपट पायरसीला बसणार आळा; कठोर तरतुदी असलेलं सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक मंजुर

एनआयएच्या तपासानुसार आरोपी देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होते. पुण्यात अभियंत्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही पाचवी अटक आहे. 3 जुलै 2023 रोजी एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर मुंबईत इतर चार जणांना अटक केली. मुंबईतील तबिश नासिर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा पुणे आणि शरजील शेख आणि ठाण्यातील झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

बी. जे. मेडिकल कॉलेजमधून शिक्षण

डॉ. सरकार हा प्रसिध्द भूलतज्ज्ञ आहे. तो सोळा वर्षांपासून तो प्रॅक्टिस करतो. त्याने एमबीबीएसचे व एमडीचे शिक्षण बी. जे. मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलेले आहे. डॉ. सरकार हा पुण्यातील नोबल हॉस्पिटल, नवले मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता. हा कारवाईनंतर पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

Tags

follow us