संतापजनक: वसतिगृहाच्या केअरटेकरनेच केला मुलींवर लैंगिक अत्याचार; जळगावमधील धक्कादायक घटना
राज्यात रोज कुठेना कुठे संतापजनक प्रकार घडताना दिसत आहे. आता अशातच जळगाव जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथील एक वसतिगृहाच्या केअरटेकरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या केअरटेकरला त्याच्या पत्नीने साथ दिली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.( jalgaon rape case five minor girl raped by caretaker)
वसतिगृहाच्या केअरटेकरचे नाव गणेश शिवाजी पंडित असे आहे. त्याने वसतिगृहातील 5 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. गेल्या दहा महिन्यापासून आरोपी या मुलींचे लैंगिक शोषण करत करत असल्याचे समोर आले आहे. तशी नोंद फिर्यादीमध्ये करण्यात आली आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
या अत्याचार प्रकरणी जिल्ह्यामधील एरंडोल तालुक्यातील खडकी गावातल्या तिघांवर कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हे वसतिगृह फक्त मुलींचे वसतिगृह आहे. येथे राहणाऱ्या पाच मुलींवर वसतिगृहाच्या केअरटेकरने लैंगिक अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे या केअरटेकरच्या पत्नीला या सर्व घटनेची माहिती आहे. तरी देखील तिने आपल्या पतीला आडवले नाही. तसेच या केअरटेकरला वसतिगृहाच्या अधिक्षका आणि सचिवाने सहकार्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या तिघांच्या विरोधात एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आता चित्रपट पायरसीला बसणार आळा; कठोर तरतुदी असलेलं सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक मंजुर
वसतीगृह खाजगी संस्थेचे
जून महिन्यात वसतीगृह बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दाखल असलेल्या पाचही मुलींना जळगाव मुलींचे निरीक्षण गृह याठिकाणी रवानगी करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलींचे जबाब घेण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी होऊन या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. शासनाची मान्यता असलेले वसतीगृह हे एका खाजगी संस्थेचे आहे ते जून महिन्यात बंद पडले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.