Download App

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली, अंडी फेकली

Nikhil Vagale : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज (9 फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी फोडली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर शाईफेक आणि अंडीही फेकण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी वागळे यांच्यासोबत गाडीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अॅडव्होकेट असीम सरोदे हेही उपस्थित होते. यावेळी वागळे यांच्यासह चौधरी, सरोदे यांच्या कपड्यात आणि शूजमध्ये काचा घुसल्या होत्या. या हल्ल्यात आंदोलनातील महिलाही जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर वागळे यांना सभास्थळी जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मदत केली. पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वागळे यांच्या गाडीच्या पुढे ऍक्टिवा गाडीवरुन त्यांना संरक्षण देत सभास्थळी पोहचवले.

नेमके काय आहे प्रकरण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते सुनील देवधर यांच्या तक्रारीनंतर 153 (अ), 500 व 505 या कलामांतर्गंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय वागळे यांच्या आज (9 फेब्रुवारी) होणारी ‘निर्भय बनो’ या सभेलाही परवानगी देऊ नये अन्यथा सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला होता.

CM शिंदेंसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाले, ‘शेतकऱ्याच्या कुटुंबातून…’

आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे भाषण होऊ देणार नाही. कायदा व सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. तसेच जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही सभेला परवानगी दिल्याने आक्रमक कार्यकर्त्यांनी वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

follow us