Download App

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण अटक; वाचा, कसा दिला पोलिसांना चकवा?, कुठं होता फरार?

अटकेची कुणकुण लागताच निलेश चव्हाण फरार झाला. त्यानं पुण्यातून कारमार्गे दिल्ली गाठली. तिथून तो राजस्थानला गेला. मग त्यानं

Nilesh Chavan In Vaishnavi Hagavane Case : गेल्या ९ दिवसांपासून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली आहे. तो फरार होता. पोलिसांची ७ पथकं त्याच्या मागावर होती. (Hagavane) वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात होतं. चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या अतिशय जवळचा आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्याची अटक महत्त्वाची आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

वैष्णवी हगवणेनं १६ मे रोजी आत्महत्या केली. सासरच्यांच्या छळाला कंटाळून तिनं आयुष्य संपवलं. यानंतर वैष्णवीच्या पती, सासू, नणंदेला अटक करण्यात आली. वैष्णवीचं बाळ हगवणे कुटुंबानं निलेश चव्हाणकडे दिलं होतं. याची माहिती मिळताच वैष्णवीचे काका आणि मामा चव्हाणच्या घरी गेले. त्यांनी बाळ ताब्यात देण्याची मागणी केली. तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावलं.

तुमच्याही बाळाला मोबाईलचं व्यसन लागलंय? फोनची सवय सोडण्यासाठी हे  5 मार्ग नक्की वापरा

अटकेची कुणकुण लागताच निलेश चव्हाण फरार झाला. त्यानं पुण्यातून कारमार्गे दिल्ली गाठली. तिथून तो राजस्थानला गेला. मग त्यानं मध्य प्रदेश गाठलं. यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेला. निलेश चव्हाण देशाबाहेर जाऊ नये यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लूकआऊट नोटिस जारी केली होती. पण तरीही चव्हाण आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यात यशस्वी ठरला. नेपाळच्या भैरहवामधील एका लॉजमध्ये त्याचा मुक्काम होता.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ४ आणि पुणे पोलिसांची ३ अशी एकूण ७ पथकं निलेश चव्हाणच्या मागावर होती. पण तरीही त्यानं ९ दिवस पोलिसांना चकवा दिला. निलेश चव्हाण सातत्यानं त्याचं लोकेशन बदलत असल्यानं त्याचा माग काढणं पोलिसांना अवघड जात होतं. निलेश चव्हाण नेपाळला गेल्याची कुणकुण पोलिसांना लागली.

पुणे सोडून फरार झाल्यानंतर निलेश चव्हाणनं एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याचा ठावठिकाणा बदलला. तो मोबाईल किंवा अन्य कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरत नव्हता. पेटीएम, एटीएम, गुगलपे यांचाही वापर त्यानं टाळला. त्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांना अवघड जात होतं. पण अखेर खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका लॉजमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

follow us