हगवणे बंधू शस्त्र परवान्यात CP ऑफिसमधील बडा अधिकारी?; IG सुपेकरांनी हात झटकत सांगितले नाव

Hagavane Borother Arm Licence Update : हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर करण्याच्या कागदपत्रांवर IG जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांची सही असल्याचे समोर आले आहे. सुपेकर यांच्यामुळेच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळाला. मात्र, आता या सर्व प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, सुपेकर यांनी शस्त्र परवान्याच्या कागदपत्रांवर पुणे पोलीस आयुक्तलायातील बड्या अधिकाऱ्याच्या आदेशानंतर सही केल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने चालवले आहे. सुपेकरांच्या या दाव्यामुळे या प्रकणाला वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; कार्यभार काढला
तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या परवानगीनंतरच केली सही
हगवणे बंधूंना देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याबाबत (Arm Licence) स्पष्टीकरण देताना सुपेकर यांनी आपल्याला शस्त्र परवाना देण्याचे अधिकार नव्हेत. हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले त्यावेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. पण, पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवान्यावरील कागदपत्रांवर सही केल्याचे सुपेकर यांनी म्हणत हात झटकले आहेत.
शस्त्र परवान्यासाठी असते 5 जणांची समिती
कोणत्याही व्यक्ती शस्त्र परवान्यासाठी अर्ज करतो. त्यावेळी संबंधित व्यक्तीला शस्त्र परवाना द्यायचा का नाही याचा अंतिम निर्णय पाच जणांची समिती घेते. ज्यात पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकचा समावेश असतो. ज्यावेळी हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात आला त्यावेळी सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. पण मंजूर करण्यात आलेल्या परवान्यावर आपण पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्या परवानगीनंतरचं सही केल्याचे आता सुपेकर यांनी म्हटले आहे. सुपेकरांच्या या दाव्यावर अद्याप गुप्ता यांचे स्पष्टीकरण समोर आलेले नसून ते या सर्व घडामोडींवर काय सांगतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न…’, वडील अनिल कस्पटेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, हगवणेंवर गंभीर आरोप
खोटी कागदपत्र देऊन घेतला शस्त्र परवाना
हगवणे कुटुंबियांकडून शस्त्र परवान्यासाठी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे अर्ज आला होता. परंतु, पोलिसांनी दोघांचेही अर्ज फेटाळले होते. यानंतर दोघांनीही पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते तयार केले. यासाठी भाडोत्री घरात राहत आहोत असे भासवण्यासाठी भाडे करार तयार केले होते. शशांकने वारजे तर सुशीलने कोथरुड भागात राहत असल्याचे दाखवले होते. याआधारे त्यांनी पोलिसांकडून पिस्तूल परवाना मिळवला होता अशी माहिती समोर येत आहे.
Wadhawan brothers : कैदेतही जगतायत अलिशान आयुष्य; IPS अमिताभ गुप्ता कनेक्शन पुन्हा समोर
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवला म्हणून शशांकविरुद्ध वारजे आणि सुशील हगवणेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तुलाचा परवाना मिळवताना आपण पुण्यातील रहिवासी असल्याचे पत्ते त्यांनी दिले होते. पुणे पोलीस आयु्क्तालयातून पिस्तूल परवाना कसा घेतला? विशेष म्हणजे एकाच दिवशी परवाने आले होते. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवले म्हणून हगवणे बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.