Nilesh Ghaiwal Parents Allegation : पुण्यातील चर्चेत असलेल्या गुंड निलेश घायवळच्या प्रकरणात आता त्याचे आई-वडील प्रथमच समोर आले आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी कुख्यात गुंड निलेश घायवळ हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता. त्यामुळे विरोधकांनी ठरवून त्याला अडकवण्याचा कट रचला, असा खळबळजनक गौप्यस्फोट निलेश घायवळची आई कुसुम घायवळ यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
राजकारणात जायचं होतं…
माझ्या मुलाला (Nilesh Ghaiwal) खोट्या गुन्ह्यात गोवत आहेत. निलेश अन् सचिनला राजकारणात जायचं होतं. राजकारण्यांनी निलेशचा वापर केलाय. घायवळ बंधूंना खच्ची करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निलेश घायवळच्या आई-वडिलांनी केलंय. आता निवडणुका आल्या म्हणून हा सगळा घाट (Pune Crime) घातला. खोटा व्हिसा काढला असता, तर सातासमुद्रापार कसा गेला असता? असा सवाल गुंड निलेश घायवळच्या आई-वडीलांनी उपस्थित केलाय.
सर्व केसेस नील…
सर्व पुरावे आल्यानंतर निलेशवरील सर्व केसेस नील केल्या होत्या. मग आता पुन्हा कसला गुन्हा टाकला? निलेश पळून गेला नाही. त्याने रीतसर व्हिसा काढला. खोटा, चुकीचा काढला नाही. लंडनमधून फरार झाला, असं म्हणतात. निलेश अन् सचिनला राजकारणात जायचं होतं, त्यामुळे विरोधकांनी अडकवण्याचा घाट घातला आहे. तो लंडनला पळून गेलेला नाही, तर नियमानुसार व्हिसा काढला.
सगळा कट रचला
राजकारणात उभं राहायचं, आमच्या गावाकडं निवडून यायचं, म्हणून हा सगळा कट रचला. विरोधक त्या दोघांना जगून द्यायचा. जेव्हा निलेश लंडनला गेला, तेव्हा मी स्वत: तिथे उभे होते. हे म्हणतात पळून गेला. व्हिसा खोटा असता तर विमानात चढू दिलं नसतं, असं देखील निलेश घायवळच्या आईने म्हटलं आहे. निलेशने बारा फ्लॅट पिस्तुल लावून घेतल्याचा आरोप केला जातोय. यावर निलेशच्या आईने म्हटलंय की, पिस्तुल लावून घेईपर्यंत सगळी लोकं झोपी गेली होती का? असे सवाल निलेश घायवळच्या आईने उपस्थित केले आहेत.